News Flash

Video : ऑस्ट्रेलियावर मात केल्यानंतर बांगलादेशी वाघांचं सेलिब्रेशन

मुस्तफिजुरने सेलिब्रेशनचा व्हिडीओ केला ट्विट

पहिल्या कसोटीत बांगलादेशची ऑस्ट्रेलियावर मात

कालचा दिवस क्रिकेटविश्वात दोन संघांसाठी अतिशय महत्वाचा ठरला. वेस्ट इंडिजच्या संघाने इंग्लंडवर मात केली, तर बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात स्टिव्ह स्मिथच्या ऑस्ट्रेलिया संघावर मात केली. आयसीसी क्रमवारीत नुकतच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवलेल्या शाकीब अल हसनने या सामन्यात दोन्ही डावांमध्ये १० विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघाची घसरगुंडी उडवण्यात शाकीबचा मोठा वाटा होता. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने २० धावांनी गमावला.

या विजयानंतर बांगलादेशी संघाने आपल्या ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर खास सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. बांगलादेशी जलदगती गोलंदाज मुस्तफिजुर रेहमानने हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरुन ट्विट केला आहे.

अवश्य वाचा – सर जाडेजांवर कुरघोडी, बांगलादेशचा शाकिब अल हसन सर्वोत्तम अष्टपैलू

या ऐतिहासीक विजयाबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनीही बांगलादेशी संघाचं कौतुक केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2017 4:13 pm

Web Title: australia tour of bangladesh 2017 watch special celebration video of team bangladesh after winning first test against australia
टॅग : Australia,Bangladesh
Next Stories
1 भारत चौथ्या सामन्यात विजयी, मालिकेत ४-० ने आघाडी
2 आपत्ती निवारणासाठी श्रीलंका प्रयत्नशील
3 गतविजेत्या कर्बरला धक्का
Just Now!
X