भारताने दिलेलं २५३ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाला न पेलवल्याने लागोपाठ दुसऱ्या सामन्यात भारताने विजय संपादन केला आहे. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात भारताने ५० धावांनी विजय मिळवत ५ सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. भारताकडून कुलदीप यादवने सामन्यात हॅटट्रीकची नोंद केली. वन-डे सामन्यांमध्ये हॅटट्रीक नोंदवणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वर कुमारनेही ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलला सामन्यात प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या.

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर आव्हान कमी होतं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर कांगारु तग धरु शकले नाहीत. कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि मधल्या फळीतला फलंदाज मार्कस स्टॉयनिसने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

  • रिचर्डसनला माघारी धाडत भुवनेश्वर कुमारचं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब
  • स्टॉयनिसच्या फटकेबाजीने कांगारुंनी ओलांडला २०० धावांचा टप्पा
  • स्टॉयनीसचा लढा सुरुच, शेवटच्या फलंदाजाच्या साथीने आक्रमक फटकेबाजी करत अर्धशतक केलं साजरं
  • कुल्टर नाईलला बाद करत पांड्याचा कांगारुंना नववा धक्का
  • स्टॉयनील आणि कुल्टर नाईलची फटकेबाजी, दोघांमध्ये ३४ धावांची भागीदारी
  • कांगारुंचे ८ गडी माघारी, संघ पराभवाच्या छायेत
  • मॅथ्यू वेड, अॅश्टन अॅगर आणि पॅट कमिन्सला माघारी धाडत कुलदीप यादवची सामन्यात हॅटट्रीक
  • हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर जाडेजाने पकडला स्मिथचा कॅच, कांगारुंचा निम्मा संघ माघारी
  • ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथची झुंज सुरुच, भारतीय आक्रमणाचा सामना करत झुंजार अर्धशतक
  • चहलच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेल माघारी, कांगारुंना चौथा धक्का
  • हेडला बाद करत चहलचा ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का
  • दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी
  • कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेडने कांगारुंचा डाव सावरला
  • डेव्हिड वॉर्नरला माघारी धाडत भुवनेश्वर कुमारचा ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का
  • कांगारुंच्या डावाची अडखळती सुरुवात, कार्टराईटचा भुवनेश्वरने उडवला त्रिफळा
  • कांगारुंकडून कु्ल्टर नाईल आणि रिचर्डसनला प्रत्येकी ३-३ बळी, कमिन्स-अॅगरला १-१ बळी
  • हार्दिक पांड्याकडून फटकेबाजीचा प्रयत्न, मात्र २५२ धावांत ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला
  • तळातल्या फलंदाजांची हाराकिरी, एकामागोमाग एक विकेट जाण्याचं सत्र सुरुच
  • सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबवला
  • ऑस्ट्रेलियाकडून कुल्टर नाईलचे सर्वाधीक ३ बळी
  • महेंद्रसिंह धोनीकडून निराशा, अवघ्या ५ धावा काढून धोनी माघारी, भारताला सहावा धक्का
  • ९२ धावांवर कोहलीला बाद करत कुल्टर नाईलचा भारताला पाचवा धक्का
  • कर्णधार विराट कोहलीकडून एका बाजूने झुंज सुरुच
  • कुल्टर नाईलच्या गोलंदाजीवर केदार जाधव माघारी, भारताला चौथा धक्का
  • चौथ्या विकेटसाठी जाधव आणि कोहलीमध्ये ५५ धावांची भागीदारी
  • केदार जाधवच्या साथीने कोहलीने पुन्हा भारताचा डाव सावरला
  • मनीष पांडे अवघ्या ३ धावांवर माघारी, भारताला तिसरा धक्का
  • अर्धशतकी खेळीनंतर अजिंक्य रहाणे धावबाद, भारताला दुसरा धक्का
  • संयमी खेळ करत अजिंक्य रहाणेनेही झळकावलं अर्धशतक, दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी
  • कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक, भारताची धावसंख्या शंभरीपार
  • दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, रहाणेची आक्रमक फटकेबाजी
  • अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरला
  • मात्र कुल्टर नाईलच्या गोलंदाजीवर रोहीत शर्मा झेलबाद, भारताला पहिला धक्का
  • रहाणे-शर्मा जोडीकडून भारताच्या डावाची सावध सुरुवात
  • भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत, ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसन आणि अॅगर यांना संधी
  • कोलकाता वन-डेत भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय