08 March 2021

News Flash

Video: धोनीचा काही ‘नेम’ नाही !

दुसऱ्या सामन्याआधी धोनीचा अनोखा सराव

कोलकाता पोलिसांच्या शुटींग रेंजमध्ये सराव करताना महेंद्रसिंह धोनी

कर्णधारपदाची जबाबदारी सोडली असली तरीही महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचा खऱ्या अर्थाने तारणहार आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही. गोलंदाजीतले बदल असो किंवा मधल्या फळीत फलंदाजी करताना संघाचा डाव सावरणं, अशी सर्व काम धोनी आजही तितक्याच दिमाखात करतो आहे. धोनीच्या संघात असण्याबद्दल आतापर्यंत अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केली, मात्र भारताचा नवीन कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी हा भारतीय संघाची गरज असल्याचं मान्य केलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत आज दुसरा वन-डे सामना खेळणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यावर जरी पावसाचं सावट असलं तरीही धोनी आपल्या सरावात कसलीही कमतरता ठेवत नाहीये. मात्र या सामन्याच्या आधी कोलकात्यात धोनीने केलेला सराव पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

गेले काही दिवस कोलकात्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे भारतीय संघाला सराव करता आलेला नाहीये, बहुतांश खेळाडूंनी हॉटेलवर राहणं पसंत केलं असतानाच धोनीने थेट शुटींग रेंज गाठली. कोलकाता पोलिसांच्या शुटींग रेंजला भेट देत धोनीने आपलं शुटींग स्किलही इथे आजमावून पाहिलं. कोलकाता पोलिसांनी आपल्या फेसबूक पेजवर धोनीचा शुटींगचा सराव करताना व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे.

धोनीसारख्या खेळाडूने आमच्या शुटींग रेंजला भेट देणं हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक बाबतीत त्याचा मेहनत करण्याचा सराव सर्वांनी घेण्यासारखा असल्याचं, कोलकाता पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं. धोनीने काल १० मी. आणि २५ मी. च्या रेंजवर शुटींगचा सराव केला. कालच बीसीसीआयने पद्मभुषण पुरस्कारासाठी धोनीच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धोनी आपला चांगला फॉर्म कायम ठेवत कांगारुंची दाणादाण उडवेल, अशी आशा सर्व क्रीडारसिक करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 9:30 am

Web Title: australia tour of india 2017 watch ms dhoni practicing shooting in kolkata police special shooting range
टॅग : Ms Dhoni
Next Stories
1 पुनरावृत्ती.. पावसाची किंवा विजयाची!
2 Pro Kabaddi Season 5 – तामिळ थलायवाजची झुंज मोडून पाटणा पायरेट्सचा विजय
3 Pro Kabaddi Season 5 – यू मुम्बाचा धुव्वा, सलग तिसऱ्या सामन्यात गुजरात विजयी
Just Now!
X