मराठमोळा केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून मात केली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 237 धावांचं आव्हान भारताने केदार जाधव आणि धोनीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 237 धावांचा पाठलाग करत असताना भारताच्या डावाची सुरुवातही अडखळत झाली होती. सलामीवीर शिखर धवन भोपळाही न फोडता माघारी परतला. मात्र त्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी-केदार जाधव यांच्यात झालेल्या भागीदारीच्या जोरावर भारताने सामन्यात विजय संपादन केला. केदार जाधवने नाबाद 81 तर धोनीने नाबाद 59 धावांची खेळी केली.
त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्याच्या जोरावर पहिल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 7 गड्यांच्या मोबदल्यात 236 धावांपर्यंत मजल मारु शकला. पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर नियंत्रण ठेवत धावसंख्या वाढली जाणार नाही याची काळजी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. कर्णधार फिंच भोपळाही न फोडता जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देत माघारी परतला.
यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि उस्मान ख्वाजा यांनी खेळपट्टीवर तग धरत संघाचा डाव सावरला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारीही झाली. मात्र विराट कोहलीने केदार जाधवच्या हाती चेंडू सोपवल्यानंतर, केदारने स्टॉयनिसला माघारी धाडत भारताला महत्वाची विकेट मिळवून दिली. दरम्यान उस्मान ख्वाजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं खरं, मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात तो देखील कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विजय शंकरकडे झेल देत माघारी परतला.
यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. ग्लेन मॅक्सवेलने 40 धावांची खेळी करत या मध्ये मोलाचं योगदान बजावलं. मात्र शमी आणि कुलदीप यादवने मधल्या फळीतल्या फलंदाजांना मोठी खेळी करण्याची संधी दिली नाही. अखेरीस 50 षटकात कांगारुंचा संघ धावांपर्यंत 236 पोहचला. भारताकडून कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. त्यांना केदार जाधवने 1 बळी घेत चांगली साथ दिली.
महेंद्रसिंह धोनी - केदार जाधव जोडीमध्ये निर्णयाक भागीदारी
पाचव्या विकेटसाठी झालेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला
रोहित शर्मा - विराट कोहलीची भागीदारी, संघाचा डाव सावरला
दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत धावसंख्येला आकार दिला
भारताची खराब सुरुवात, शिखर धवन माघारी
कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलने घेतला झेल
ग्लेन मॅक्सवेल त्रिफळाचीत, मोहम्मद शमीचा धडाका कायम
ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी माघारी, मोक्याच्या क्षणी भारताचं दमदार पुनरागमन
अर्धशतकवीर ख्वाजा माघारी, कांगारुंना तिसरा धक्का
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विजय शंकरने सीमारेषेवर घेतला सुरेख झेल
ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश, स्टॉयनिस माघारी
केदार जाधवच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने घेतला स्टॉयनिसचा झेल
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, कर्णधार फिंच बाद
जसप्रीत बुमराहने फिंचला चकवत, धोनीकडे झेल द्यायला भाग पाडलं. एकही धाव न करता फिंच माघारी
सलग दोन चौकार लगावत धोनीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 6 गडी राखून भारत विजयी
धोनीने अर्धशतक पूर्ण करत भारताला अजुन विजयाच्या जवळ आणून ठेवलं आहे.
धोनीच्या साथीने भागीदारी रचत केदार जाधवचं अर्धशतक, भारत विजयाच्या नजिक
पाचव्या विकेटसाठी झालेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला
झॅम्पाच्या गोलंदाजीवर रायुडू झेलबाद, भारत खडतर अवस्थेत
कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर कर्णधार फिंचने घेतला रोहितचा झेल
झॅम्पाच्या गोलंदाजीवर विराट पायचीत, कोहलीचं अर्धशतकही हुकलं
दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत धावसंख्येला आकार दिला
कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलने घेतला झेल
भारताला विजयासाठी 237 धावांचं आव्हान
विराट कोहलीने घेतला झेल, बुमराहचा सामन्यातला दुसरा बळी
ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी माघारी, मोक्याच्या क्षणी भारताचं दमदार पुनरागमन
मोहम्मद शमीने उडवला टर्नरचा त्रिफळा
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या नादात हँडस्काँब यष्टीचीत
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विजय शंकरने सीमारेषेवर घेतला सुरेख झेल
ख्वाजाने एका बाजूने किल्ला लढवत आपलं अर्धशतक साजरं केलं आहे.
केदार जाधवच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने घेतला स्टॉयनिसचा झेल
भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत दोन्ही फलंदाजांनी कांगारुंना 50 धावांचा टप्पा गाठून दिला
जसप्रीत बुमराहने फिंचला चकवत, धोनीकडे झेल द्यायला भाग पाडलं. एकही धाव न करता फिंच माघारी
भारतासमोर मालिकेची सुरुवात विजयाने करण्याचं आव्हान