श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत २-० असा विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचं विमान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात जमिनीवर आलं आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅरॉन फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत, भारतावर १० गडी राखून मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वॉर्नरने या सामन्यात नाबाद १२८ तर फिंचने नाबाद ११० धावा केल्या.

दोन्ही सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात आक्रमक केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. अर्धशतकी भागीदारीचं दोन्ही फलंदाजांनी शतकी भागीदारीत रुपांतर केलं. भारताचा एकही गोलंदाज ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना माघारी धाडू शकला नाही.

त्याआधी, नवीन वर्षात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासोबत पहिला वन-डे सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने २५५ धावांपर्यंत मजल मारली.ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय धावगतीवर अंकुश लावला. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने ७४ तर लोकेश राहुलने ४७ धावांची खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.

भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या १० धावा काढून माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुलने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान शिखर धवनने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. लोकेश राहुल अर्धशतकापासून अवघ्या ३ धावा दूर असताना बाद झाला आणि भारताची जोडी फुटली. यानंतर भारतीय फलंदाजांनी निराशाजनक खेळी केली.

शिखर धवन ७४ धावांची खेळी करुन माघारी परतल्यानंतर एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. सर्व फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिल्यामुळे मोक्याच्या षटकांमध्ये भारत धावसंख्या वाढवू शकला नाही. तळातल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २५५ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ३, पॅट कमिन्स आणि रिचर्डसनने २ तर झॅम्पा-आगरने १-१ बळी घेतला.

Live Blog

20:25 (IST)14 Jan 2020
डेव्हिड वॉर्नरकडून विजयी चौकार, १० गडी राखून कांगारु विजयी

३ सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया १-० ने आघाडीवर

20:13 (IST)14 Jan 2020
ऑस्ट्रेलियन कर्णधाराचं शतक

वॉर्नरपाठोपाठ फिंचनेही शतक झळकावत संघाला विजयाच्या जवळ नेलं आहे

19:56 (IST)14 Jan 2020
डेव्हिड वॉर्नचं शतक, कांगारुंची द्विशतकी मजल

भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत वॉर्नरची शतकी खेळी, ऑस्ट्रेलिया विजयाच्या जवळ

18:59 (IST)14 Jan 2020
फिंच-वॉर्नरची अर्धशतकं, कांगारुंची सामन्यावर भक्कम पकड

पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये शतकी भागीदारी

अवश्य वाचा - Ind vs Aus : पहिल्याच सामन्यात डेव्हिड वॉर्नरची विक्रमाला गवसणी

18:29 (IST)14 Jan 2020
पंतऐवजी लोकेश राहुल करतोय भारताचं यष्टीरक्षण, जाणून घ्या कारण...
18:28 (IST)14 Jan 2020
ऑस्ट्रेलियन सलामीवीरांची आक्रमक सुरुवात

फिंच-वॉर्नर जोडीची धडाकेबाज अर्धशतकी भागीदारी

17:25 (IST)14 Jan 2020
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २५६ धावांचं आव्हान

अखेरच्या फळीतल्या फलंदाजांची फटकेबाजी

17:16 (IST)14 Jan 2020
भारताचा अखेरचा गडी बाद, मोहम्मद शमी माघारी

रिचर्डसनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कॅरीने घेतला झेल, भारताची २५५ धावांपर्यंत मजल

17:15 (IST)14 Jan 2020
कुलदीप यादव माघारी, भारताला नववा धक्का

फटकेबाजी करत कुलदीपने धावसंख्या २५० पार नेली

16:55 (IST)14 Jan 2020
शार्दुल ठाकूर माघारी, भारताला आठवा धक्का

मिचेल स्टार्कने घेतला बळी, शार्दुलच्या १३ धावा

16:46 (IST)14 Jan 2020
ठराविक अंतराने ऋषभ पंतही माघारी, भारताला सातवा धक्का

पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर पंत स्मिथच्या हाती झेल देत माघारी

16:40 (IST)14 Jan 2020
अखेरीस भारताची जमलेली जोडी फुटली, रविंद्र जाडेजा माघारी

रिचर्डसनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कॅरीकडे झेल देऊन जाडेजा माघारी, ३२ चेंडूत २५ धावांची खेळी

सहाव्या विकेटसाठी जाडेजाची पंतसोबत ४९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी

16:34 (IST)14 Jan 2020
पंत-जाडेजाची संयमी फलंदाजी

भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा

15:59 (IST)14 Jan 2020
श्रेयस अय्यर माघारी, भारताला पाचवा धक्का

मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर झेलबाद, भारताची मधली फळी कोलमडली

15:50 (IST)14 Jan 2020
कर्णधार विराट कोहली माघारी, भारताला चौथा धक्का

झॅम्पाने आपल्याच गोलंदाजीवर घेतला विराटचा सुरेख झेल...

15:39 (IST)14 Jan 2020
धवन ७४ धावांवर माघारी, भारताला तिसरा धक्का

धवन ७४ धावांवर माघारी, भारताला तिसरा धक्का

15:32 (IST)14 Jan 2020
राहुलचं अर्धशतक हुकलं, भारताला दुसरा धक्का

राहुलने दमदार खेळी करत ६१ चेंडूत ४७ धावा केल्या, पण अर्धशतकाने मात्र त्याला हुलकावणी दिली. त्याने ४ चौकार लगावले.

15:04 (IST)14 Jan 2020
15:03 (IST)14 Jan 2020
शिखर धवनचं संयमी अर्धशतक, भारताचा डाव सावरला

लोकेश राहुलसोबत भागीदारी रचत शिखर धवनचं अर्धशतक, भारताने ओलांडला १०० धावांचा टप्पा

14:29 (IST)14 Jan 2020
भारताची सावध सुरुवात, ओलांडला ५० धावांचा टप्पा

रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुल जोडीची संयमी फलंदाजी

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत ओलांडला ५० धावांचा टप्पा

13:53 (IST)14 Jan 2020
भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नरने घेतला रोहितचा झेल

क्रॉस सिमने टाकलेल्या चेंडूमुळे रोहितचा फटका फसला

13:17 (IST)14 Jan 2020
भारतीय संघात तिन्ही सलामीवीरांना संधी

असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ...

13:16 (IST)14 Jan 2020
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

असा असेल ऑस्ट्रेलियाचा अंतिम ११ जणांचा संघ...