News Flash

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील वेळापत्रकात बदल

टी-20 सामन्याचं ठिकाण बदललं

24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रस्तावित भारत दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. याआधी ठरवण्यात आलेल्या वेळापत्रकानूसार दोन्ही संघ 24 फेब्रुवारीरोजी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिला टी-20 सामना खेळणार होते. मात्र कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने सुरक्षाव्यवस्थेचं कारण दिल्यामुळे हा सामना विशाखापट्टणमला हलवण्यात आला आहे. याबदल्यात 27 तारखेला होणारा सामना बंगळुरुत खेळवला जाईल. क्रिकेट प्रशासकीय समितीने परवानगी दिल्यानंतर बीसीसीआयने वेळापत्रकातला बदल जाहीर केला आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 2 टी-20 आणि 5 वन-डे सामने खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 11:32 am

Web Title: australia tour of india dates of bengaluru and visakhapatnam t20s swapped
टॅग : Bcci,Ind Vs Aus
Next Stories
1 Pro Volleyball League : कोची ब्ल्यू स्पाईकर्सची यू मुम्बा व्हॉलीवर मात
2 आईच्या निधनाचं दुःख विसरुन तो मैदानात उतरला, विंडीजच्या खेळाडूचं सर्वत्र कौतुक
3 घरच्या मैदानावर विंडीजची सरशी, दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडवर मात
Just Now!
X