Ind vs Aus 2nd Test Day 2 Live Updates – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला. त्यास प्रत्युत्तर म्हणून कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी केलेल्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने २ तर हेजलवूडने १ बळी टिपला. विराट कोहली ८२ धावांवर तर रहाणे ५१ धावांवर खेळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. उपहारापर्यंत भारताने ६ धावा करून मुरली विजयचा बळी गमवला. दुसऱ्या सत्रात राहुल २ धावा काढून त्रिफळाचित झाला. विराट कोहलीबरोबर अर्धशतकी भागीदारी करणारा पुजारा तिसऱ्या सत्राच्या सुरूवातीला २४ धावांवर झेलबाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. स्टार्कने त्याला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले.

त्याआधी दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात मिळाल्यानंतर अखेर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडले. इशांत शर्माने सर्वाधिक ४ बळी टिपत यजमानांचा डाव गुंडाळण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद ३२६ वर आटोपला. अष्टपैलू पॅट कमिन्स त्रिफळाचित झाला आणि आजच्या दिवसातील भारताला पहिले यश मिळाले. कमिन्स ६६ चेंडूत १९ धावा करून बाद झाला.  ३८ धावांची संयमी खेळी करणारा टीम पेन पायचीत झाला. बुमराहने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला. मिचेल स्टार्क १० चेंडूत ६ धावा करून बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा नववा गडी बाद झाला. पंतने त्याचा झेल टिपला. पाठोपाठ हेजलवूडला शून्यावर बाद करत इशांतने ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच आणि हॅरिस यांनी अतिशय सावध पवित्रा घेत डावाला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात ठेवलेली फलंदाजीची संथ लय कायम ठेवत चहापानापर्यंत ३ बाद १४५ अशी मजल मारली. पहिल्या सत्रात एकही बळी न गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सत्रात ३ बळी गमावले. शेवटच्या सत्रात पीटर हॅंड्सकॉम्ब ७ धावा करून बाद झाला. विराट कोहलीने स्लिपमध्ये अफलातून झेल टिपत त्याला माघारी धाडले. इशांतने त्याचा काटा काढला.

खेळपट्टीवर स्थिरावलेल्या शॉन मार्शला ४५ धावांवर झेलबाद व्हावे लागले. त्यानंतर संयमी खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड अर्धशतक (५८) ठोकून बाद झाला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपला.

Live Blog

Highlights

  • 15:36 (IST)

    कोहली-रहाणेची संयमी फलंदाजी; दिवसअखेर भारत ३ बाद १७२

    ?????????????????????? ??????? ?????? ??????? ??????? ???????? ? ??? ??? ???? ??????. ????????????? ????? ??? ??? ??????? ??????. ????? ??????????? ?????? ??????? ????? ????? ??? ????????? ??????? ????? ?? ??????? ???????? ????? ???????????? ?????? ??????? ?? ??????????????? ??? ????? ???. ??????????????? ????????? ? ?? ????????? ? ??? ?????.

  • 15:13 (IST)

    उपकर्णधार रहाणेचे ९५ चेंडूत अर्धशतक

    ???????????? ?? ???? ???????? ???? ?????????? ????????? ??????? ??????? ???????? ????? ????????? ?????? ??????? ??? ?? ?????? ??????? ?????. ?????? ?????? ????? ? ????? ??? ? ????? ??????.

  • 13:45 (IST)

    कर्णधार कोहलीचे १०९ चेंडूत अर्धशतक

    ????????? ?????? ??????? ???? ?????????? ??????? ??????? ??? ??????. ?????? ??? ?????? ??????? ???????.?????? ? ????? ??????.

  • 12:21 (IST)

    पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २ बाद ७०

    ????? ???? (?) ??? ????? (?) ???? ???? ??? ???????? ???????? ?????? ??? ??????? ????? ??????? ??????? ??? ??????. ?? ??????? ??????????? ??????????????? ?? ??????? ???????? ??? ??????? ? ??? ?? ?? ??????????????? ????????.

  • 09:51 (IST)

    मुरली विजय त्रिफळाचीत; भारत उपहारापर्यंत १ बाद ६

    ?????? ??????????? ????????????? ????? ???? ????????.  ????????????? ????? ??? ??????? ??? ?? ??????. ???????? ???????????? ??????? ? ???? ???? ????? ?????? ??? ?????.

  • 09:29 (IST)

    भारताने गुंडाळली ऑस्ट्रेलियाची शेपूट; पहिला डाव सर्वबाद ३२६

    ??????? ????? ?????? ??????? ???????????? ???? ?????? ??????????? ??????????????? ??????? ?????????? ???? ?????? ?????. ????? ??????? ???????? ? ??? ???? ????????? ??? ??????????? ???????? ?????? ??????. ???????? ????????????? ????? ??? ??????? ??? ?? ??????.

15:36 (IST)15 Dec 2018
कोहली-रहाणेची संयमी फलंदाजी; दिवसअखेर भारत ३ बाद १७२

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला. त्यास प्रत्युत्तर म्हणून कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी केलेल्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने २ तर हेजलवूडने १ बळी टिपला.

15:13 (IST)15 Dec 2018
उपकर्णधार रहाणेचे ९५ चेंडूत अर्धशतक

सुरुवातीच्या २० धावा फटकेबाजी करून जमावणाऱ्या उपकर्णधार अजिंक्य रहाणेने त्यानंतर कसोटी क्रिकेटला साजेशी फलंदाजी करत ९५ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकार लगावला.

14:46 (IST)15 Dec 2018
कोहली - रहाणे यांची अर्धशतकी भागीदारी

भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा बाद झाल्यावर कोहलीने उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यासह डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केली. या भागीदारीत रहाणेने महत्वाची भूमिका बजावली आहे.

13:45 (IST)15 Dec 2018
कर्णधार कोहलीचे १०९ चेंडूत अर्धशतक

भारताच्या डावाची सुरुवात खराब झाल्यानंतर कर्णधार कोहलीने डाव सावरला. त्याने १०९ चेंडूत अर्धशतक झळकावले.त्याने ६ चौकार लगावले.

13:22 (IST)15 Dec 2018
पुजारा २४ धावांवर झेलबाद; भारताला तिसरा धक्का

विराट कोहलीबरोबर अर्धशतकी भागीदारी करणारा पुजारा २४ धावांवर झेलबाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. स्टार्कने त्याला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले.

12:21 (IST)15 Dec 2018
पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २ बाद ७०

मुरली विजय (०) आणि राहुल (२) दोघे झटपट बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. या दोघांनी चहापानाच्या विश्रांतीपर्यंत ६२ धावांची भागीदारी करत भारताला २ बाद ७० या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

10:39 (IST)15 Dec 2018
राहुल २ धावांवर त्रिफळाचीत; भारताला दुसरा धक्का

सलामीवीर लोकेश राहुल २ धावांवर त्रिफळाचीत झाला. जोश हेजलवूड याने ऑफ स्टंपमध्ये यॉर्कर चेंडू टाकून भारताला दुसरा धक्का दिला.

09:51 (IST)15 Dec 2018
मुरली विजय त्रिफळाचीत; भारत उपहारापर्यंत १ बाद ६

भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची शेपूट झटपट गुंडाळली.  ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद ३२६ वर आटोपला. त्यानंतर उपहारापर्यंत भारताने ६ धावा करून मुरली विजयचा बळी गमवला.

09:29 (IST)15 Dec 2018
भारताने गुंडाळली ऑस्ट्रेलियाची शेपूट; पहिला डाव सर्वबाद ३२६

दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात मिळाल्यानंतर अखेर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडले. इशांत शर्माने सर्वाधिक ४ बळी टिपत यजमानांचा डाव गुंडाळण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद ३२६ वर आटोपला.

09:24 (IST)15 Dec 2018
मिचेल स्टार्क बाद; ऑस्ट्रेलियाचा नववा गडी माघारी

मिचेल स्टार्क १० चेंडूत ६ धावा करून बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा नववा गडी बाद झाला. पंतने त्याचा झेल टिपला.

09:08 (IST)15 Dec 2018
टीम पेन पायचीत, ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का

३८ धावांची संयमी खेळी करणारा टीम पेन पायचीत झाला. बुमराहने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला.

09:03 (IST)15 Dec 2018
पॅट कमिन्स त्रिफळाचित, ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का

अष्टपैलू पॅट कमिन्स त्रिफळाचित झाला आणि आजच्या दिवसातील भारताला पहिले यश मिळाले. कमिन्स ६६ चेंडूत १९ धावा करून बाद झाला.

08:37 (IST)15 Dec 2018
ऑस्ट्रेलियाची त्रिशतकी मजल; भारताची डोकेदुखी वाढली

६ बाद २७७ या ध्वसांख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी त्रिशतकी मजल मारली. या बरोबरच पेन आणि कमिन्स यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली.

08:13 (IST)15 Dec 2018

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ६ बाद २७७ धावा केल्या. त्यावेळी पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन हे मैदानावर होते. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या खेळात हे या दोघांकडून ऑस्ट्रेलियाला खूप अपेक्षा आहेत.

--

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia vs india nd test perth live update
First published on: 15-12-2018 at 07:48 IST