Australia vs India 2nd Test Perth live update – भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली. उस्मान ख्वाजाच्या नाबाद ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १७५ धावांची आघाडी घेतली आहे. त्याआधी भारताचा डाव २८३ धावांत आटोपला. त्या डावात कर्णधार विराट कोहलीने १२३ धावांची खेळी केली तर नॅथन लॉयनने ५ बळी टिपले.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अतिशय संथ झाली. फिंचने ३० चेंडूत २५ धावा करत डावाला वेग देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो ‘रिटायर्ड हर्ट’ झाला व तंबूत परतला. त्याच वेळी चहापानाची विश्रांती घेण्यात आली. अखेरच्या सत्रात बुमराहच्या चेंडूवर हॅरीस २० धावा काढून बाद झाला. पहिल्या डावात अर्धशतकाने हुलकावणी दिलेला शॉन मार्श (४५) दुसऱ्या डावात झेलबाद झाला. शमीने त्याला ५ धावांवर बाद केले. हँड्सकॉम्बही १३ धावांवर पायचीत झाला. तर पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा ट्रेव्हिस हेड झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी तंबूत परतला. हेडने केवळ १९ धावा केल्या. सध्या ख्वाजा ४१ आणि पेन ८ धावांवर नाबाद आहेत.

नॅथन लॉयनने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताचा पहिला डाव २८३ धावांवर संपुष्टात आला. पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. विहारीच्या साथीने कोहलीने डाव पुढे नेला आणि आपले शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर विहारी (२०), कोहली (१२३) आणि शमी (०) झटपट बाद झाले. ऋषभ पंतने काही काळ झुंज दिली पण तोदेखील ३६ धावांवर माघारी परतला. अखेर बुमराहला माघारी पाठवत लॉयनने भारताचा डाव संपवला.

तत्पूर्वी काल दुसऱ्या दिवसअखेर भारताने ३ बाद १७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला. त्यास प्रत्युत्तर म्हणून कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी केलेल्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. उपहारापर्यंत भारताने ६ धावा करून मुरली विजयचा बळी गमवला.

दुसऱ्या सत्रात राहुल २ धावा काढून त्रिफळाचित झाला. विराट कोहलीबरोबर अर्धशतकी भागीदारी करणारा पुजारा तिसऱ्या सत्राच्या सुरूवातीला २४ धावांवर झेलबाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. स्टार्कने त्याला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद ३२६ वर आटोपला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच (५०), हॅरिस (७०) आणि हेड (५८) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही मजल मारली. इशांत शर्माने सर्वाधिक ४ बळी टिपत यजमानांचा डाव गुंडाळण्यात महत्वाची भूमिका बजावली.

Live Blog

15:28 (IST)16 Dec 2018
ऑस्ट्रेलियाचं पारडं जड; १७५ धावांची आघाडी

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली. उस्मान ख्वाजाच्या नाबाद ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १७५ धावांची आघाडी घेतली आहे. त्याआधी भारताचा डाव २८३ धावांत आटोपला. त्या डावात कर्णधार विराट कोहलीने १२३ धावांची खेळी केली तर नॅथन लॉयनने ५ बळी टिपले.

14:51 (IST)16 Dec 2018
ट्रेव्हिस हेड झेलबाद; ऑस्ट्रेलियाचे ४ गडी तंबूत

पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा ट्रेव्हिस हेड झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी तंबूत परतला. हेडने केवळ १९ धावा केल्या.

13:50 (IST)16 Dec 2018
हँड्सकॉम्ब बाद, ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

पहिल्या डावात विराटने अफलातून झेल टिपलेला हँड्सकॉम्ब या डावात पायचीत झाला. इशांतने टाकलेला वेगवान चेंडू त्याच्या पायावर आदळला आणि तो १३ धावांवर माघारी परतला.

13:27 (IST)16 Dec 2018
शॉन मार्श झेलबाद; ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का

पहिल्या डावात अर्धशतकाने हुलकावणी दिलेला शॉन मार्श (४५) दुसऱ्या डावात झेलबाद झाला. शमीने त्याला ५ धावांवर बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला.

13:12 (IST)16 Dec 2018
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, हॅरीस बाद

ऑस्ट्रेलियाला बुमराहने पहिला धक्का दिला. सावध सुरूवात केल्यानंतर बुमराहच्या चेंडूवर हॅरीस २० धावा काढून बाद झाला.  दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक झाले असून त्यांच्याकडे ९७ धावांची आघाडी आहे.

12:37 (IST)16 Dec 2018
ऑस्ट्रेलियाची संथ सुरुवात; चहापानापर्यंत बिनबाद ३३

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अतिशय संथ झाली. फिंचने ३० चेंडूत २५ धावा करत डावाला वेग देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो 'रिटायर्ड हर्ट' झाला व तंबूत परतला. त्याच वेळी चहापानाची विश्रांती घेण्यात आली.

11:17 (IST)16 Dec 2018
लॉयनचे ५ बळी; भारत सर्वबाद २८३

भारताविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ पर्थच्या मैदानावर रंगला असून सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू आहे. नॅथन लॉयनने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताचा पहिला डाव २८३ धावांवर संपुष्टात आला.

10:35 (IST)16 Dec 2018
इशांत शर्मा माघारी; भारताला आठवा धक्का

इशांत शर्मा माघारी; भारताला आठवा धक्का

09:48 (IST)16 Dec 2018
कोहली पाठोपाठ शमी माघारी; उपहारापर्यंत भारत ७ बाद २५२

भारताने उपहारापर्यंत भारत ७ बाद २५२ या धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. विहारीच्या साथीने कोहलीने डाव पुढे नेला आणि आपले शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर विहारी (२०), कोहली (१२३) आणि शमी (०) झटपट बाद झाले.

09:45 (IST)16 Dec 2018
शतकवीर कोहली माघारी; भारताचा सहावा गडी बाद

शतकवीर कोहली माघारी; भारताचा सहावा गडी बाद

09:13 (IST)16 Dec 2018
हनुमा विहारी बाद; भारताचा निम्मा संघ तंबूत

चांगली सुरुवात मिळाल्यानंतर हनुमा विहारी २० धावांवर बाद झाला. त्याला हेजलवूडने बाद केले.

08:46 (IST)16 Dec 2018
कॅप्टन कोहलीचे झुंजार शतक

कर्णधार विराट कोहलीने झुंजार खेळी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील २५ वे शतक झळकावले. त्याने २१९ चेंडूत झळकावलेल्या शतकात ११ चौकार लगावले.

--

07:59 (IST)16 Dec 2018
सर्व मदार कर्णधार विराट कोहलीवर

अनुभवी अजिंक्य रहाणे ५१ धावांवर बाद झाल्यामुळे भारतीय संघाची सर्व मदार आता  विराट कोहलीवर आहे. विराट कोहली ८१ धावांवर खेळत आहे. भारत आणखी १५३ धावांनी पिछाडीवर आहे. 

07:55 (IST)16 Dec 2018
रहाणे बाद

तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या षटकात रहाणे बाद झाला. फिरकी गोलंदाज नाथन लॉयनने रहाणेला ५१ धावांवर बाद केले.