News Flash

रहाणेचा जन्मच नेतृत्व करण्यासाठी झाला; ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू झाला फिदा

मुंबईकर अजिंक्य रहाणेवर कौतुकांचा वर्षाव

मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटीच्या विजयाचा शिल्पकार भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे याचं कौतुक सर्वजण करत आहेत. त्याच्या नेतृत्वानं सर्वांना प्रभावित केलं आहे. आजी-माजी खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. यातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांची भर पडली आहे. रहाणेकडे उपजत नेतृत्वगुण आहेत. कौशल्य आणि धाडस या गुणांमुळे तो आपला ठसा उमटवतो, अशी प्रशंसा ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी केली आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फो सोबत बोलताना दिग्गज खेळाडू इयान चॅपेल म्हणाले, ‘‘मेलबर्न क्रिकेट मैदानावर रहाणेने निर्दोष नेतृत्व केले. २०१७मध्ये ज्यांनी धरमशाला येथे रहाणेला नेतृत्व करताना पहिले असेल, त्यांनी त्याच्यातील ही नेतृत्व कला त्याचवेळी ओळखली असेल,’’ असे चॅपेल यांनी सांगितले.

आणखी वाचा : पाच खेळाडूंसह संपूर्ण भारतीय संघ आज सिडनीत

माजी कर्णधार इयान चॅपेल म्हणाले, ‘२०१७ मध्ये धरमशाला येथील सामन्यात त्यानं घेतलेल्या निर्णायानं मी प्रभावित झालो होतो. शतकी खेळी करणार्‍या डेविड वॉर्नर आणि स्मिथ यांना रोखण्यासाठी रहाणेनं पदार्पण करणार्‍या कुलदीप यादवला आक्रमणासाठी बोलवले. हे एक साहसी पाऊल होते. यादवने वार्नरची विकेट घेतली. त्यानंतर भारतीय संघाने विजय मिळवला.’

आणखी वाचा : ऑस्ट्रेलियाला धक्का; दुखापतीमुळे आघाडीचा वेगवान गोलंदाज संघाबाहेर

‘‘जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा तो शांतपणे त्याला सामोरा जातो. त्याने संघातील सहकाऱ्यांकडून योग्य आदर मिळवला आहे, जो चांगल्या कर्णधारासाठी आवश्यक असतो,’’ असं कौतुक चॅपेल यांनी मराठमोळा रहाणेचं केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 10:19 am

Web Title: australia vs india ajinkya rahane is brave smart and born to lead cricket teams says ian chappell nck 90
Next Stories
1 ‘नियमांतर्गत खेळा नाहीतर इथे येऊ नका’, क्विन्सलँडच्या सरकारने भारतीय टीमला सुनावलं
2 ऑस्ट्रेलियाला धक्का; दुखापतीमुळे आघाडीचा वेगवान गोलंदाज संघाबाहेर
3 तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघासाठी Good News
Just Now!
X