आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहचला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियात पोहचलेला भारतीय संघ सध्या क्वारंटाइनमध्ये आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करत आहे. क्वारंटाइनमध्ये भारतीय खेळाडू आपला वेळ घालवण्यासाठी विविध कल्पना लढवत आहेत. सध्या सोशल मीडियावर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एका गाण्यावर दोघे नृत करत असताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

शिखर धवनने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ‘सात समुंदर पार मैं तेरे…’ या गाण्यावर शिखर-पृथ्वी डान्स करताना दिसत आहे. मजेदार बाब म्हणजे, शिखर धवन आपला टी-शर्ट काढून गाड्यावर ताल धरत आहे. तर पृथ्वी शॉ लैला झाला आहे. शिखरनं व्हिडीओ पोस्ट करताना तसा उल्लेखही केला आहे. ‘

शिखर धवनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

टीम इंडियाचा प्रस्तावित ऑस्ट्रेलिया दौरा
पहिला वन-डे सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वन-डे सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वन-डे सामना – १ डिसेंबर – मनुका ओव्हल
————————————————————–
पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – मनुका ओव्हल
दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
—————————————————————
पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गॅबा