डेव्हिड वॉर्नर क्रिकेट जगतातील सर्वाधिक आक्रमक फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या वॉर्नर पाकिस्तान विरोधात कसोटी मालिका खेळत आहे. अॅडिलेडमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या दिवस-रात्र सामन्यात वॉर्नरने मारलेला एक जोरदार शॉट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Whoops! #AUSvPAK | https://t.co/0QSefkJERk pic.twitter.com/HpEwgwlm1H
— cricket.com.au (@cricketcomau) November 29, 2019
सामन्यातील ४२वी ओव्हर सुरु होती. पाकिस्तानचा इफ्तेकार अहमद वॉर्नरसमोर गोलंदाजी करत होता. दरम्यान ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर वॉर्नरने एक जोरदार शॉट मारला. वॉर्नरने मारलेला हा शॉट इतका जोरदार होता की सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या शाहीन आफ्रिदीला त्याच्या दिशेने येणारा बॉल दिसलाच नाही. परिणामी वॉर्नरला चौकार मिळाला. या शॉटमुळे पाकिस्तानी क्षेत्ररक्षणाची मात्र, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.
या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १ बाद ३०२ अशी आहे. डेव्हिड वॉर्नर १६६ धावांवर नाबाद फलंदाजी करत आहे. तर दुसरीकडे Marnus Labuschagne १२६ धावांवर नाबाद आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2019 7:02 pm