News Flash

ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

बाबर आझमचे शतक व्यर्थ

(संग्रहित छायाचित्र)

ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी मालिका

पहिल्या कसोटी सामन्यात रविवारी पाकिस्तानचा एक डाव आणि पाच धावांनी पराभव करून ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.

पहिल्या डावात ३४० धावांनी पिछाडीवर पडलेल्या पाकिस्तानचा दुसरा डाव सामन्याच्या चौथ्या दिवशी ३३५ धावांत आटोपला. बाबर आझमने १०४ धावांची झुंजार खेळी साकारली. मोहम्मद रिझवानला (९५) शतकाने हुलकावणी दिली. जोश हॅझलवूड (४/६३), मिचेल स्टार्क (३/७३) आणि पॅट कमिन्स (२/६९) यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. मार्नस लबूशेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान (पहिला डाव) : सर्व बाद २४०

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ५८०

पाकिस्तान (दुसरा डाव) : ८४.२ षटकांत सर्व बाद ३३५ (बाबर आझम १०४, मोहम्मद रिझवान ९५; जोश हॅझलवूड ४/६३)

सामनावीर : मार्नस लबूशेन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 1:25 am

Web Title: australia win australia pakistan test series abn 97
Next Stories
1 सचिनचा सल्ला आला कामी, विराटने झळकावलं दिवस-रात्र कसोटीतलं पहिलं शतक
2 भारत – बांगलादेश कसोटी सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ५ जणांना अटक
3 IND vs BAN : भारताच्या जलदगती त्रिकुटाने गाजवली मालिका, जाणून घ्या आकडेवारी
Just Now!
X