इच्छा असली की सर्व गोष्टी साध्य होतात असे म्हटले जाते. याची प्रचिती एका ९१ वर्षाच्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूकडून आली. हा क्रिकेटपटू चक्क ९१व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करतो. डग क्रोवेल असे या क्रिकेटपटूचे नाव असून ते या वयात खेळणाऱ्या एका दुर्मिळ गटाचा भाग आहेत. त्यांनी मोठ्या स्तरावर ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व कलेले नाही, पण त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती आणि खेळाबद्दलची आवड त्यांना या वयातही क्रिकेटच्या मैदानात घेऊन आली आहे.

ऑस्ट्रेलियामधील वेटरन्स क्रिकेट ही एक अशी स्पर्धा आहे, ज्यामध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे खेळाडू भाग घेतात. ही स्पर्धात्मक लीग असून डग क्रोवेल १५ वर्षांपासून खेळत आहेत. क्रोवेल म्हणाले, ”३०व्या किंवा त्याहून अधिक वयात क्रिकेट सोडणाऱ्यांसाठी ही लीग आहे. मला खेळायला आवडते आणि मी तंदुरुस्त राहतो. चेंडू आता बॅटवर तितका वेगवान येत नाही. आता चेंडू मारणे सोपे आहे कारण चेंडू हळूहळू आपल्यापर्यंत पोहोचतो”, असे क्रोवेल यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.

 

डग क्रोवेल यांच्याकडे तरूण वयात व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी जास्त संसाधने नव्हती. कारण त्यांच्याकडे लहान शेती असणाऱ्या समुदायासाठी क्लब नव्हता. तसेच दुसऱ्या महायुद्धात इंधनाची कमतरता असल्याने त्यांना इतरत्र प्रवास करणे अशक्य होते.

१९४६मध्ये त्यांनी विंटन क्रिकेट क्लबची स्थापना केली. क्रोवेल म्हणाले, ”आम्ही संकटात कसे क्रिकेट खेळायचे ते शिकलो, पण त्यामुळे कुणालाही दुखावले नाही.” डग क्रोवेल यांचे क्रिकेटवर खूप प्रेम आहे आणि आता ते ळत राहू इच्छित आहे. स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा टेनिस खेळतो असेही क्रॉवेल यांनी सांगितले.