News Flash

‘मी गे नाही!’; सोशल मिडियावरील पोस्टवरुन गोंधळानंतर ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचे स्पष्टीकरण

वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पोस्टवर अनेकांनी समलिंगी असल्याचे सांगितल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले

जेम्स फॉकनर (फाइल फोटो)

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनर काल २९ वर्षांचा झाला. आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशननिमित्त पोस्ट केलेल्या फोटोवरुन फॉकनर गे असल्याची चांगलीच चर्चा सोशल नेटवर्किंगवर रंगली. फोटोच्या कॅप्शनवरुन तो गे असल्याचे नेटकऱ्यांना वाटले आणि त्याची पोस्ट व्हायलर झाली. अनेकांनी त्यांचा पाठिंबा देत त्याने दाखवलेल्या हिंमतीबद्दल त्याचे कौतुकही केलं. मात्र आज पुन्हा एकदा फॉकनरने एक पोस्ट करुन आपण गे नसल्याचे म्हटले आहे.

काय होती ती पोस्ट…

जेम्स फॉकनरने आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या मित्राबरोबर एक फोटो शेअर केला. या फोटोबरोबरच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते, ‘बर्थ डे डिनर विथ बॉयफ्रेण्ड (बेस्ट मेट) रॉब जब अॅण्ड आय रोजलीन कॅरोल फॉकनर.’ या कॅप्शनमध्ये त्याने #TogatherFor5Years हा हॅशटॅगही वापरला होता. याच फोटो कॅप्शनमुळे बर्थ डे बॉय फॉकनर हा गे असल्याची चांगलीच चर्चा या पोस्ट खाली रंगली. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच त्याचे अभिनंदनही केले. आपण समलिंगी असल्याचं जाहीर करणारा जेम्स हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिला क्रिकेटपटू असल्याच्या बातम्याही अनेक वेबसाईटने प्रसिद्ध केल्या.

 

View this post on Instagram

 

Birthday dinner with the boyfriend (best mate!!!) @robjubbsta and my mother @roslyn_carol_faulkner #togetherfor5years

A post shared by James Faulkner (@jfaulkner44) on

मात्र कालच्या पोस्टवरुन बरीच चर्चा रंगल्यानंतर जेम्सने आज सकाळी स्वत:चा एक फोटो शेअर करत एक चर्चेला पूर्णविराम दिला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कालच्या पोस्टवरुन झालेल्या गोंधळाबद्दल त्याने स्पष्टीकरण दिले. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘काल रात्री मी केलेल्या पोस्टमुळे अनेकांचा मोठा गैरसमज झाल्याचं दिसत आहे. मी गे नाही. तरीही एलजीबीटी समुदायाकडून आणि इतरांकडून मिळालेला पाठिंबा पाहून आनंद झाला. प्रेम हे प्रेम असतं, हे कधीही विसरता कामा नये. रॉब जब माझा फक्त चांगला मित्र आहे. आम्ही पाच वर्षांपासून एकाच घरात राहत आहोत, कालची रात्री ही त्याचंच सेलिब्रेशन होतं. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.’

दरम्यान काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन महिला खेळाडूंनी लग्नगाठ बांधली. न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू हेली जेन्सन आणि ऑस्ट्रेलियाची निकोला हॅनकॉक या १८ एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकल्या. या दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियात महिलांच्या बिग बॅश लीग स्पर्धेत मेलबर्न स्टार्स संघाकडून खेळतात. मेलबर्न स्टार्सनेही आपल्या ट्विटर हँडलवरुन या दोघींना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 10:27 am

Web Title: australian cricketer james faulkner says i am not gay
Next Stories
1 सायनाला दुसऱ्या विजेतेपदाचे वेध!
2 टॉटेनहॅम आयएक्सचा अश्वमेध रोखणार?
3 स्मिथच्या नेतृत्वावर राजस्थानची मदार!
Just Now!
X