03 April 2020

News Flash

इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची आयपीएलकडे पाठ ?

2019 विश्वचषकासाठी दोन्ही क्रिकेट बोर्डांचा सावध पवित्रा

इयन मॉर्गन आणि बेन स्टोक्स (संग्रहीत छायाचित्र)

2019 साली होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एका कालावधीनंतर उपलब्ध नसण्याची शक्यता आहे. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डांनी आपले खेळाडू 1 मे नंतर आयपीएल खेळणार नाहीत, असं बीसीसीआयला कळवल्याचं समजतंय. 2019 साली होणाऱ्या विश्वचषकामुळे आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. एरवी एप्रिलमध्ये सुरु होणारी स्पर्धा 2019 साली 29 मार्चला सुरु होणार आहे.

2019 सालचा विश्वचषक 30 मे पासून इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना व विश्वचषकाचा सुरुवातीचा सामना यामध्ये अवघ्या 18 दिवसांचं अंतर आहे. या कारणासाठी दोन्ही क्रिकेट बोर्डांनी सावधगिरीची भूमिका घेतल्याचं समजतं आहे. याचसोबत दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानेही अशीच भूमिका घेतल्याचं समजतं असून, आफ्रिकेचे खेळाडू 12 मे नंतर खेळणार नसल्याचं समजतंय. या वृत्ताला बीसीसीआयने अजुन दुजारो दिलेला नाहीये, मात्र तिन्ही क्रिकेट बोर्डांनी घेतलेल्या भूमिकेवर बीसीसीआय काय म्हणतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2018 3:53 pm

Web Title: australian english players to miss part of ipl 2019 says sources
टॅग Ipl
Next Stories
1 China Open Badminton : पी. व्ही. सिंधूची आगेकूच सुरु, रशियाच्या प्रतिस्पर्ध्यावर मात
2 विराटला भारतरत्न पुरस्कार द्या; क्रीडा संघटनेची पंतप्रधानांकडे मागणी
3 भारत-विंडिज सामन्याआधी योगी सरकारने बदललं स्टेडियमचं नाव
Just Now!
X