News Flash

विराट कोहलीची खिल्ली उडवणाऱ्या ऑस्ट्रेलियन पत्रकाराला नेटीझन्सनी केलं ट्रोल

विराटची टर उडवणारा व्हिडीओ पोस्ट करणं पडलं महागात

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधली कोणतीही क्रिकेट मालिका ही वादांशिवाय पूर्ण होत नाही. सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनतरही विराट कोहली आणि टीम पेन यांच्यात झालेल्या वादामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटलं. अनेक माजी खेळाडूंनी विराटच्या आक्रमक स्वभावावर टीका केली. कोहली आणि पेन यांच्यात झालेल्या तू-तू, मै-मै नंतर एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने, भारतातील एका स्थानिक क्रिकेट सामन्याचा व्हिडीओ पोस्ट करत विराटची खिल्ली उडवली.

मात्र ऑस्ट्रेलियन पत्रकाराला विराटची खिल्ली उडवणं नंतर चांगलंच महागात पडलं. नेटीझन्सनी विराटची टर उडवणाऱ्या पत्रकाराला स्टिव्ह स्मिथच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाची आठवण करुन देत गप्प केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 9:29 pm

Web Title: australian journalist troll by indian fans after he posted video to mock virat kohli
टॅग : Ind Vs Aus,Virat Kohli
Next Stories
1 IND vs AUS : विराट सौरव गांगुलीचा वारसा पुढे चालवतोय !
2 टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्विट केला बाळाचा पहिला फोटो
3 IND vs AUS : विराट कोहली वाघ, त्याला पिंजऱ्यात कैद करु नका !
Just Now!
X