ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत एकेरी प्रकारात भारताच्या आशांवर पाणी फिरलेलं आहे. एकेरी लढतीत भारताच्या युकी भांबरीला पहिल्या फेरीत मार्कोस बगदातीसकडून पराभव पत्करावा लागला. बगदातीसने भांबरीचं आव्हान ७-६, ६-६, ६-३ अशा फरकाने परतवून लावलं.

याआधी यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या मुख्य फेरीत दाखल होणारा युकी हा एकमेव भारतीय खेळाडू ठरला होता. भारताचे आव्हान राखताना युकी भांब्रीने कॅनडाच्या पीटर पोलनस्कीवर मात करीत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान मिळवले. मात्र सहकारी रामकुमार रामनाथनला मुख्य फेरी गाठण्याचे स्वप्न साकार करता आले नाही.

भांब्रीने २००९ मध्ये येथे कनिष्ठ गटात विजेतेपद मिळवले होते. वरिष्ठ गटाच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्याची ही त्याची तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१५ मध्ये त्याला पहिल्या फेरीत अँडी मरेने हरवले होते. २०१६ मध्येही त्याला पहिल्या फेरीत टॉमस बर्डीचविरुद्ध हार मानावी लागली होती.