08 March 2021

News Flash

Australian Open 2019 : ज्योकोविचला जेतेपद, नदालला पराभवचा धक्का

6-3, 6-2, 6-3 असा पराभव

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने राफेल नदालचा पराभव करत पुरुष एकेरीच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे.  6-3, 6-2, 6-3 अशा फरकाने ज्योकोविचने नदालचा पराभव केला. या जेतेपदासह जोकोव्हिचने रॉजर फेडरर आणि रॉय इमर्सन यांना मागे टाकत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी झालेल्या सामन्यावर पुर्णपणे वर्चस्व गाजवले. नदालचा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत सामना ३-० च्या फरकाने जिंकला. तिन्ही सेटमध्ये नदालला एकही संधी दिली नाही. पहिला सेट ६-३ च्या फरकाने जिंकत ज्योकेव्हिचने वेगवाग सुरूवात केली. त्यानंतर संपूर्ण सामन्याभर नदालला एकदी संधी न देता सामन्यावर नाव कोरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2019 4:42 pm

Web Title: australian open 2019 novak djokovic defeats rafael nadal in the mens singles final
Next Stories
1 सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्सचं विजेतेपद, दुखापतीमुळे कॅरोलिनाची माघार
2 सरफराज अहमदवर ४ सामन्यांची बंदी, वर्णद्वेषी वक्तव्य भोवलं
3 सायना नेहवाल इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत दाखल
Just Now!
X