News Flash

Australian Open : सेरेना विल्यम्स स्पर्धेतून बाहेर

कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिने केला पराभव

टेनिसपटू सेरेना विल्यम्स

Australian Open : ७ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणारी सेरेना विल्यम्स हिचे या स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले आहे. सातव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिने १६व्या मानांकित सेरेनाला ६-४, ४-६, ७-५ असे पराभूत केले.

प्लिस्कोव्हाने पहिला सेट ६-४ असा जिंकला. त्यानंतर सरेनाने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि चोख प्रत्युत्तर दिले. या बरोबरी नंतर तिसरा सेट अपेक्षेप्रमाणे अटीतटीचा झाला.पण अखेर प्लिस्कोव्हा वरचढ ठरली. तिने तिसरा सेट ७-५ असा जिंकून सेरेनाला स्पर्धेबाहेर केले.

पराभवानंतर बोलताना सेरेना म्हणाली की माझ्या घोट्याला दुखापत झाली असली तरी सध्या मी ठीक आहे. कदाचित उद्या ही दुखापत उचल खाईल. पण पराभवाला ते कारण होऊ शकत नाही. प्लिस्कोव्हा खूप छान खेळली आणि तिने मोक्याच्या क्षणी गुण पटकावले.

प्लिस्कोव्हाने ‘राऊंड ऑफ १६’मध्येही जोरदार कामगिरी केली होती. तिने त्या फेरीत १८ व्या मानांकित गार्बिन मुगरुझा हिला ६-३, ६-१ असे पराभूत केले होते. तर सेरेनाने अग्रमानांकित हालेपला ६-१, ४-६, ६-४ असा पराभवाचा धक्का दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 10:44 am

Web Title: australian open star tennis player serena williams out of tournament
Next Stories
1 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी सचिन तेंडुलकरची बॅटींग
2 IND vs NZ : नेपियरच्या मैदानात शमीच्या बळींचं शतक, केली अनोख्या विक्रमाची नोंद
3 भारताच्या ‘गब्बर’शेर कडून किवींची शिकार; मालिकेत 1-0 ने आघाडी
Just Now!
X