भारताच्या सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन बॅडिमटन सुपरसीरिजमध्ये विजय मिळविला आहे. सायनाचा चीनची सुआन यु हिच्यासोबत चुरशीचा अंतिम सामना रंगला. या सामन्यात भारताच्या फुलराणीने सुआनविरुद्ध ११-२१, २१-१४, २१-१९ असा विजय मिळवला.  या विजयासह या मोसमातील तिचं हे पहिलचं जेतेपद आहे. तर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचंच्या जेतेपदीवर नाव कोरलं .
ऑस्ट्रेलियन ओपन २०१६ सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यात सायना नेहवालनं पहिला सेट ११-२१ असा गमावला. मात्र, नंतर सायनाने दणक्यात पुनरागमन करत दुसरा सेट २१-१४ ने जिंकला तर तिसऱ्या सेटमध्ये १५-१४ ने आघाडी घेतली. यापूर्वी सायनाने आतापर्यंत सुआनविरुद्धच्या सहा लढतींपैकी पाच लढतींमध्ये विजय मिळविला आहे. सायनाने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते मात्र सुपरसीरिजमध्ये तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. सायनाने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित खेळाडू यिहान वाँग हिच्यावर २१-८, २१-१२ असा सहज विजय मिळवित अंतिम फेरी गाठली होती.