जपानच्या नाओमी ओसाकाने आज शनिवार ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेवर नाव कोरले आहे. एकेरीच्या अंतिम सामन्यात नाओमीने चेक रिपब्लिकच्या पेट्रा क्वितोवाचा 7-6, 5-7, 6-4 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवणारी ओसाका पहिली जपानी खेळाडू आहे.

या जेतेपदासह सोमवारी जाहीर होणाऱ्या डब्ल्यूटीए क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर पोहचली आहे. टेनिस ऐकरीच्या अव्वल स्थानावर पोहचणारी पहिली आशियाई खेळाडू ठरली आहे. ओसाकाचा हा दुसरे ग्रँड स्लॅम आहे. याआधी तिने यूएस ओपन स्पर्धेवर नाव कोरलं होतं. एकापाठोपाठ ऑस्ट्रेलियन ओपन आणि यूएस ओपन स्पर्धेवर नाव कोरत ओसाकाने सेरेना विलियम्सची बरोबरी केली आहे.

२१ वर्षीय ओसाकाने चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. पण याआधी तीनवेळा तिला अपयशाचा सामना करवा लागला होता. पण आज झालेल्या सामन्यात ओसाकाने पेट्रा क्वितोवाचा सलग तीन सेटमध्ये 7-6, 5-7, 6-4 असा पराभव केला.