News Flash

क्वारंटाइन कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी घेतली आपल्या कुटुंबीयांची भेट

IPLच्या स्थगितीनंतर मालदीव आणि आपल्या देशात होते क्वारंटाइन

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू

आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात खेळलेले ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू आणि इतर सदस्यांनी आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. या कालावधीनंतर ते त्यांच्या कुटुंबीयांना भेटले. करोनाने बायो बबलला भेदल्यानंतर आयपीएलचा १४वा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला. आता ही स्पर्धा यूएईत आयोजित होणार आहे.

आयपीएल २०२१मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य असलेला वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फने फॉक्स स्पोर्ट्सला सांगितले, “आम्ही आमच्या घरी पोहोचलो आहोत. कोणत्याही ठिकाणी अडकणे नेहमीच कठीण असते. आम्ही घरी पोहोचू हे आम्हाला ठाऊक होते आणि आता आम्ही सुटकेचा श्वास घेत आहोत.”

हेही वाचा – क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! १७ सप्टेंबरपासून रंगणार आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा

 

 

हेही वाचा – कुस्तीपटू सुशील कुमारला घेऊन दिल्ली पोलीस हरिद्वारला रवाना

आयपीएल २०२१ पुढे ढकलण्यात आल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवमध्ये थांबले होते. ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मेपर्यंत भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती, त्यामुळे हे खेळाडू आणि सदस्य दोन आठवड्यांसाठी मालदीवमध्ये क्वारंटाइन कालावधीत होते.
“सोमवारी पहाटे सिडनी येथील हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि समालोचक त्यांच्या कुटूंबाला भेटले. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते”, असे एका वृत्तात सांगण्यात आले आहे.

आयपीएल २०२१ स्थगित

भारतात करोनाची दुसरी लाट कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्यात येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर करोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहा यांना संसर्ग झाल्याचे आढळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 1:49 pm

Web Title: australian players meet their families after completing the quarantine period adn 96
Next Stories
1 क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! १७ सप्टेंबरपासून रंगणार आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा
2 इंग्लंडच्या माजी कर्णधाराला रोहितच्या नेतृत्वाखाली खेळायचंय IPL!
3 ठरलं तर! यूएईत होणार IPL २०२१चा उर्वरित हंगाम
Just Now!
X