आयपीएल २०२१मध्ये सामील झालेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू येत्या एक-दोन दिवसांत मायदेशी परतणार आहेत. सिडनीला परतल्यावर ते हे खेळाडू क्वारंटाइन राहतील, त्यावेळी बीसीसीआय त्यांचा खर्च उचलेल. भारतातील करोनाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकारने १५मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू, सदस्य आणि सहाय्यक कर्मचारी मालदीवला गेले. आता ते शनिवारी किंवा रविवारी सिडनीमध्ये पोहोचू शकतात.

सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन खेळाडू, सदस्य आणि क्रीडा कर्मचार्‍यांच्या प्रवासासाठी व त्यांच्या क्वारंटाइन संबंधित खर्च बीसीसीआय उचलणार आहे. आयपीएल पुढे ढकलल्यानंतर खेळाडूंसह एकूण ३८ ऑस्ट्रेलियाचे सदस्य मालदीवला रवाना झाले.

मायकेल हसी निगेटिव्ह

चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसीची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आतातो पुढच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकेल. फ्रेंचायझीने याबाबत माहिती दिली. “हसीचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तो परत कसा जाईल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तो मालदीवमध्ये जाणार नाही, असे आम्ही ऐकले आहे. पण तो येत्या आठवड्यात निघून जाईल”, असे चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी सांगितले.

आयपीएल २०२१ स्थगित

भारतात करोनाची दुसरी लाट कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्यात येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर करोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहा यांना संसर्ग झाल्याचे आढळले.