News Flash

मियामी ओपन : ऑस्ट्रेलियाच्या बार्टीला विजेतेपद

अंतिम सामन्यात बिआन्का अँड्रेस्कूला दुखापत

अॅश्ले बार्टी

मियामी ओपनच्या महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात बार्टी आणि कॅनडाची बिआन्का अँड्रेस्कू आमनेसामने आले होते. मात्र, दुखापतीमुळे बिआन्का मागे हटली. त्यामुळे बार्टीला विजेता घोषित करण्यात आले.

 

जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या बार्टीने पहिला सेट 6-3 असा नावावर केला. दुसऱ्या सेटमध्येही ती 4-0 अशी पुढे होती. मात्र, या सेटदरम्यान बिआन्काला उजव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तिला रिटायर्ड हर्ट होऊन सामन्यातून बाहेर व्हावे लागले.

 

विजेता झाल्यानंतर बार्टी म्हणाला, “मला अंतिम सामना असा खेळायचा नव्हता. अँड्रेस्कूबद्दल वाईट वाटते. मला आशा आहे की ती लवकरच ठीक होईल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 1:51 pm

Web Title: australias ash barty wins her second successive miami open adn 96
Next Stories
1 IPLपूर्वी करोनाचा कहर, RCBच्या खेळाडूला झाली लागण
2 KKRमधून प्रमुख खेळाडू बाहेर, RCBच्या माजी खेळाडूला घेतले संघात
3 2011 WC : फायनल पाहतानाचा दोन ‘मुंबईकर’ क्रिकेटपटूंचा जुना फोटो व्हायरल
Just Now!
X