News Flash

ऑस्ट्रेलियातही आर्मस्ट्राँग हा टवाळकीचा विषय

उत्तेजक औषधे सेवनाची कबुली दिल्यानंतर लोकांच्या गळ्यातील ताईत असलेला सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग हा आता टवाळकीचा विषय झाला आहे. येथील एका ग्रंथालयाने त्याच्यावरील पुस्तकांची रवानगी

| January 22, 2013 12:01 pm

 उत्तेजक औषधे सेवनाची कबुली दिल्यानंतर लोकांच्या गळ्यातील ताईत असलेला सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग हा आता टवाळकीचा विषय झाला आहे. येथील एका ग्रंथालयाने त्याच्यावरील पुस्तकांची रवानगी कादंबरी विभागात केली आहे. लान्स आर्मस्ट्राँग-जगातील श्रेष्ठ सायकलपटू आदी पुस्तकांसह त्याच्यावरील सर्व पुस्तके आता कादंबरी विभागात लावली जाणार आहेत, अशी सूचना येथील मॅनले ग्रंथालयाने लिहिली आहे. या ग्रंथालयातील वरिष्ठ पदाधिकारी वेंडी फोर्ड यांनी सांगितले, एका आठवडय़ापूर्वी आर्मस्ट्राँगवरील पुस्तकांना भरपूर मागणी होती. आता मात्र त्याच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. त्याच्या पुस्तकांकरिता आता आगाऊ नोंदणी केली जात नाही.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 12:01 pm

Web Title: austrelias armstrong subject is warst
टॅग : Austrelia
Next Stories
1 भारतास नावलौकिक मिळविण्यासाठी हॉकी इंडिया लीग उपयुक्त : सरदारासिंग
2 मुंबई मॅरेथॉनमध्ये युगांडाचा झेंडा
3 ताऱ्यांच्या साक्षीने मुंबईकरांची धाव
Just Now!
X