मुंबई रॉकेट्सवर २-१ अशी मात

सायनाच्या अनुपस्थितीतही अवध वॉरियर्स संघाने विजयी सलामी दिली. सलामीच्या लढतीत मुंबई रॉकेट्सच्या आरएमव्ही गुरुसाईदत्तने वॉरियर्सच्या बी. साईप्रणीतवर १४-१५, १५-१०, १५-८ असा विजय मिळवला. दुहेरीच्या लढतीत रॉकेट्सच्या मॅथिअस बो आणि व्लादिमीर इव्हानोव्ह यांनी वॉरियर्सच्या काई युन आणि हेंद्रा गुणवान जोडीवर १५-११, १५-११ अशी मात केली. हूकमी लढतीत पराभव झाल्याने वॉरियर्सचा एक गुण वजा झाला.

महिला एकेरीत रॉकेट्सच्या रुथविका गड्डेने वॉरियर्सच्या वृषालीचा १५-१३, १५-१० असा पराभव केला. रॉकेट्स संघानेही हूकमी लढत गमावली. वॉरियर्सच्या तानोआंगसुकने रॉकेट्सच्या प्रणॉयला १५-१२, १४-१५, १५-१४ असे नमवले. शेवटच्या लढतीत वॉरियर्सच्या बोडीन इसारा आणि ख्रिस्तिना  जोडीने व्लादिमीर इव्हानोव्ह आणि कॅमिला जुहल जोडीवर १५-९, १४-१५,१५-१४ असा विजय मिळवला.