30 September 2020

News Flash

बीडचा अविनाश साबळे चमकला, स्टीपलचेस शर्यतीत मिळवलं ऑलिम्पिक तिकीट

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नोंदवली सर्वोत्तम वेळ

मुळचा बीडचा आणि सध्या भारतीय लष्करात हवालदार पदावर काम करणाऱ्या, अविनाश साबळेने दोहा येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ३००० मी. स्टीपलचेस शर्यतीत सर्वोत्तम वेळ नोंदवत टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. अविनाशने आपला राष्ट्रीय विक्रम मोडत ८:२१:३७ अशी वेळ नोंदवली. ३००० मी. शर्यतीत नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची अविनाशची गेल्या वर्षभरातली ही चौथी वेळ ठरली आहे.

अंतिम फेरीत अविनाश तेराव्या स्थानावर राहिला. २०१८ साली जून महिन्यात गुवाहटी येथे झालेल्या आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत अविनाशने ८:४९:२५ अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. यानंतर फेडरेशन कप आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या कामगिरीत सुधारणा करत अविनाशने ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 8:16 am

Web Title: avinash sable qualifies for tokyo olympics sets new national record again psd 91
Next Stories
1 भारताचा चित्रेश नटेशन ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’
2 जमुना बोरोकडून भारताच्या अभियानाची विजयी सुरुवात
3 जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : भारताच्या पदरी दुहेरी निराशा!
Just Now!
X