तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर तर भारताचा पहिला डाव १४५ धावांत संपुष्टात आला. रोहित शर्माचा (६६) अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवातही खराब झाली. अक्षर पटेलने दुसऱ्या डावात पाच बळी टिपले आणि सामन्यात १० गडी बाद करत पराक्रम केला.

Ind vs Eng: अश्विन ठरतोय डावखुऱ्या बेन स्टोक्ससाठी कर्दनकाळ

अक्षर पटेलने इंग्लंडच्या पहिल्या डावात ३८ धावा देऊन ६ गडी बाद केले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी केली. या डावात त्याने ३२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. एका सामन्यात सर्वात कमी धावा देऊन १० गडी टिपण्याचा विक्रम त्याने केला. तसेच, अक्षर पटेलची ही कामगिरी दिवस-रात्र कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठकली. या आधी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने एका सामन्यात सर्वाधिक १० बळी टिपले होते. तर वेस्ट इंडिजच्या देवेंद्र बिशूने भारताविरूद्ध दीडशेहून अधिक धावा देत १० बळींचा टप्पा गाठला होता. अश्विनने मात्र ७० धावा देत ११ गडी बाद केले.

Ind vs Eng Video: बोल्ड, DRS, बोल्ड…. पाहा अक्षरची नाट्यमय गोलंदाजी

दरम्यान, पहिल्या डावाअखेरीस १३ धावांनी पिछाडीवर असलेला इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या ८१ धावांवर गारद झाला. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्या फिरकीपुढे इंग्लंडचे फलंदाज अक्षरश: हतबल झाल्याचे दिसून आले. जॅक क्रॉली (०), जॉनी बेअरस्टो (०), डॉम सिबली (७), जो रूट (१९), बेन स्टोक्स (२५), ओली पोप (१२) आणि बेन फोक्स (८) हे सात महत्त्वाचे फलंदाज अतिशय स्वस्तात बाद झाले. त्यानंतर जोफ्रा आर्चर (०), जॅक लीच (९) आणि जेम्स अँडरसन (०) हे तळाचे फलंदाज लगेच माघारी परतले. अक्षरने ५, अश्विनने ४ तर वॉशिंग्टन सुंदरने १ गडी बाद केला.