21 January 2019

News Flash

Video : इंझमामच्या पुतण्याने केले साथीदाराला धावचीत; सोशल मीडियावर खिल्ली

इंझमाम एकदिवसीय कारकिर्दीत एकूण ४० वेळा हास्यास्पद पद्धतीने धावचीत झाला. आता त्याचा पुतण्या इमाम उल हक एका हास्यास्पद रन-आउटमुळे चर्चेत आला आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक हा एकेकाळचा सर्वोत्तम फलंदाज होता. त्याने अनेकदा पाकिस्तानला अनेक सामने जिंकून दिले. असे असले तरी इंझमामची एक गोष्ट चाहत्यांना कायम लक्षात राहते ती म्हणजे त्याचे धावचीत बाद होणे किंवा साथीदार फलंदाजाला धावचीत करणे. इंझमामच्या एकूण कारकिर्दीत एकेरी, दुहेरी आणि तिहेरी धावांची संख्या फार कमी आहे. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत तो एकूण ४० वेळा हास्यास्पद पद्धतीने धावचीत झाला.

आता इंझमामचा पुतण्या इमाम उल हक हा देखील एका सामन्यातील हास्यास्पद रन आउटमुळे चर्चेत आला आहे. इमाम उल हकने नॉर्थम्टन्शायरविरुद्धच्या सामन्यात एक चेंडू फाईन लेगच्या दिशेने टोलवला आणि धाव घेण्यास सुरुवात केली. मात्र आपल्या साथीदाराकडे लक्ष देण्याऐवजी तो चेंडूकडे बघत धावू लागला. नॉन स्ट्राईकवर असलेल्या अझर अलीने त्याला चुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र इमाम आणि अझरची अखेर टक्कर झाली. त्यामुळे अझर अली धावचीत झाला आणि इमाम मात्र कमरेवर ठेवून उभा राहिला.

हा पहा व्हिडीओ –

या घटनेनंतर इमामला ट्रॉल करण्यात आले. त्याची चाहत्यांनी खिल्ली उडवली. जसा काका तसा पुतण्या, ही तर इंझमामची आठवण करून देणारी घटना आहे, हे गल्ली क्रिकेट सुरु आहे का?, इंझमामच्या पुतण्याने धावचीत करण्याची परंपरा कायम ठेवली, अशा विविध कमेंट करून चाहत्यांनी इमामला ट्रोल केले.

First Published on May 17, 2018 11:49 am

Web Title: azar ali runout by inzamams nephew got trolled on social media
टॅग Cricket,Pakistan