भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटीमध्ये ३१ धावांनी पराभव झाल्याने भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-०ने मागे पडला आहे. आजपासून लॉर्डवर दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. भारतीय संघ मालिका बरोबर आणण्यासाठी नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहे. अशाच एका प्रॅक्टीस सेशन दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडून अझर मोहम्मदची धावती भेट घेतली. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटीमध्ये ३१ धावांनी पराभव झाल्याने भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-०ने मागे पडला आहे. आजपासून लॉर्डवर दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. भारतीय संघ मालिका बरोबर आणण्यासाठी नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहे. अशाच एका प्रॅक्टीस सेशन दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडून अझर मोहम्मदची धावती भेट घेतली.

या भेटीबद्दल स्वत: अझरने भारतीय संघाच्या कर्णधाराबरोबरच एक फोटो ट्विटवर पोस्ट करुन माहिती दिली. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अझरने स्वत:लाच ट्रोल केले आहे. फोटो ट्विट करताना लिहीलेल्या कॅप्शनमध्ये अझर म्हणतो, ‘नेहमीच या व्यक्तीला पाहून आनंद होतो, सर्वच तरुण तसेच माझ्यासारख्या वयस्करांना विराट कोहली प्रेरणा देतो. तुला खूप साऱ्या शुभेच्छा.’ एकेकाळी आपल्या फलंदाजीबरोबरच गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा अझर मागील दोन वर्षांपासून पाकिस्तानी संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. अझर पाकिस्तानी संघासाठी खेळला असला तरी आता त्याने ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले असून तो सध्या ब्रिटनमध्येच असतो. म्हणूनच इतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये बंदी असतानाही अझर पंजाब किंग्स इलेव्हकडून खेळताना दिसला होता.

आजपासून लॉर्डसच्या मैदानात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या कसोटीमध्ये अपेक्षेप्रमाणेच फलंदाजीत भारतीय संघ कच खाताना दिसला. फलंदाजी हा सध्या भारतासाठी चिंतेचा विषय आहे. विराट कोहली वगळता एकही फलंदाज पहिल्या कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करु शकला नाही. विराटने पहिल्याच कसोटीमध्ये दोन डावात २०० धावांचा पल्ला गाठला. तर दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी पहिल्या कसोटीप्रमाणेच या कसोटीतही भेदक गोलंदाजी केल्यास संघाला त्याचा फायदाच होईल. इंग्लंड या समान्यात विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत २-०ने आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करेल तर दुसरीकडे भारतीय संघ मालिका १-१च्या बरोबरीत आणण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.