प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाच्या लहान बहिणीचा बुधवारी विवाह झाला. सानियाची लहान बहिण अनम मिर्झा बुधवारी पारंपारिक विवाह सोहळयात मोहम्मद असदउद्दीन बरोबर विवाहबद्ध झाली. मोहम्मद असदउद्दीन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि हैदराबाद क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा आहे. दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन विवाहाची घोषणा केली.
अनम मिर्झा आणि असद बऱ्याच महिन्यांपासून परस्परांना डेट करत होते. अनमचा हा दुसरा निकाह असून गेल्याच वर्षी तिने पती अकबर रशीदशी घटस्फोट घेतला. २०१६ मध्ये अनम आणि अकबर यांचा निकाह पार पडला होता आणि दोन वर्ष पूर्ण होण्याआधीच ते विभक्त झाले.
अनम असदपेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठी आहे. या दोघांना अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. सानिया मिर्झानेही असदचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये ‘फॅमिली’ (कुटुंब) असं लिहिलं होतं. अनम फॅशन डिझाइनर असून तिचे स्वत:चे फॅशन आऊटलेटदेखील आहे. तर वडिलांप्रमाणेच असदला क्रिकेटमध्ये करिअर करायचे असून त्याची गोव्याच्या रणजी टीममध्ये निवड झाली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2019 8:33 pm