News Flash

अ‍ॅटलेटिको माद्रिदकडे आघाडी कायम

अ‍ॅटलेटिको माद्रिदने महत्त्वपूर्ण सामन्यात एल्चे संघावर १-० असा निसटता विजय मिळवत ला-लीगा फु टबॉलमध्ये दोन गुणांची आघाडी कायम ठेवली आहे

ला-लीगा फुटबॉल

अ‍ॅटलेटिको माद्रिदने महत्त्वपूर्ण सामन्यात एल्चे संघावर १-० असा निसटता विजय मिळवत ला-लीगा फु टबॉलमध्ये दोन गुणांची आघाडी कायम ठेवली आहे. या विजयासह अ‍ॅटलेटिको माद्रिदने ३४ सामन्यांत ७६ गुणांसह अग्रस्थान कायम राखले आहे.

रेयाल माद्रिदने ओसासुनावर २-० असा विजय मिळवला असला तरी ते ३४ सामन्यांत ७४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे पुढील चार साखळी सामन्यांत जेतेपदाची चुरस अधिक तीव्र होत जाणार आहे.

मार्कस लॉरेंटे याने २३ व्या मिनिटाला अ‍ॅटलेटिकोला आघाडी मिळवून दिल्यानंतर एल्चेला भरपाई वेळेत पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आले. एडेर मिलिटाओ (७६व्या मिनिटाला) आणि कॅ सेमिरो (८०व्या मिनिटाला) यांनी दिलेल्या उपयुक्त योगदानामुळे रेयाल माद्रिदला विजय मिळवता आला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:26 am

Web Title: aztelico maintains lead over madrid football ssh 93
Next Stories
1 माजी राष्ट्रीय निवड समिती सदस्य किशन रुंगठा यांचे करोनामुळे निधन
2 समाजमाध्यमांवरील बहिष्काराचे मेसीकडून समर्थन
3 इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल
Just Now!
X