भारतीय बॅडमिंटनपटू बी. साई प्रणित याने इंडोनेशियाचा खेळाडू जोनाथन क्रिस्टी याला हरवत विजय मिळविला आहे. थायलंड येथे झालेल्या पुरुष एकेरी स्पर्धेत त्याने हा विजय मिळविला आहे. १७-२१, २१-१८, २१-१९ अशा फरकाने प्रणित याने क्रिस्टी याचा पराभव केला. याच्या आधीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रणित याने थायलंडचा खेळाडू कांटाफोन वांगचारोएन याला हरविले.
शेवटच्या सामन्यात प्रणित आणि क्रिस्टी १९ गुणांवर सोबत होते. मात्र काही वेळाने २ गुण मिळवत प्रणितने आघाडी घेतली. हा खेळ तब्बल ७२ मिनिटे सुरु होता. अशाप्रकारे यश मिळवत साई प्रणीत याने २०१७ च्या सामन्यात यश मिळविले. साई प्रणित याने २०१६ च्या कॅनडा ओपन ग्रॅंड प्रीक्स मध्येही विजय मिळवला होता. प्रणित याने थायलंडच्या थोंगनुआमला हरवत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. तर क्रिस्टीने मलेशियाच्या के जू वेन सूंगला हरवत अंतम सामन्यासाठी स्थान निश्चित केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2017 7:27 pm