पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या वन-डे संघाचं नेतृत्व, तरुण खेळाडू बाबर आझमकडे सोपवलं आहे. गेल्या वर्षी बाबर आझमकडे पाकिस्तानच्या टी-२० संघाची सूत्र सोपवण्यात आली होती. यानंतर वन-डे संघाचं नेतृत्व देऊन पाक क्रिकेट बोर्डाने बाबर आझमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत परिपत्रक काढत याविषयी माहिती दिली आहे. दरम्यान अझर अली पाकिस्तानचं कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करेल.
Azhar Ali confirmed Test captain while Babar Azam to lead Pakistan in ODIs and T20Is in the 2020-21 season.
More: https://t.co/KD8O0P4EML https://t.co/xLXlfvW3Nr pic.twitter.com/31tQTtvmAc
— Pakistan Cricket (@TheRealPCB) May 13, 2020
पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदची याआधीच कसोटी आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर खराब कामगिरीचं कारण देत पाक क्रिकेट बोर्डाने वन-डे संघाचं नेतृत्वही सरफराजच्या हातातून काढत बाबरकडे सोपवलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे निवड समिती प्रमुख आणि मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल-हक यांनी नवीन जबाबदारीसाठी बाबर आझमचं अभिनंदन केलं आहे.
पाक क्रिकेट बोर्डाने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक करार यादीत हसन अली, वहाब रियाझ, मोहम्मद आमिर यांना स्थान दिलं नसून माजी कर्णधार सरफराजला अ गटातून ब गटात ढकलण्यात आलं आहे. सध्या करोनामुळे जगभरातील क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्यास नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 13, 2020 5:26 pm