भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया हैदराबाद कसोटी सामना
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामन्याला आज(शनिवार) सकाळी सुरूवात झाली. ऑस्ट्रेलियचा कर्णधार मायकल क्लार्कने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भुवनेश्वर कुमारने क्लार्कचा निर्णय चुकीचा ठरवत आँस्ट्रेलियाच्या सलामिच्या फलंदाजांना संघाच्या अवघ्या १५ धावा असताना बाद केले. भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची जेवणापर्यंत ४ बाद ८६ अशी अवस्था केली आहे. डेव्हिड वॉर्नर ६ धावांवर त्रिफळा आणि एड कोवान ४ धावांवर पायचीत होऊन बाद झाला. त्यानंतर शेन वॉटसन आणि फिल ह्युजेस आँस्ट्रेलिया संघाचा डाव सावरत असतानांच भुवनेश्वर कुमारने शेन वॉटसनला २३ धवांवर पायचीत बाद केले. त्यापाठोपाठ ह्यजेसही अश्विनच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. आता मायकल क्लार्क २० आणि मॅथ्यू वेड ३ धावांवर खेळत आहेत.