भारत विरूद्ध इंग्लंड पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात देखील भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. अवघ्या पन्नास धावांच्या आत भारताचे पाच फलंदाज बाद झाले. यात युवराज सिंग आणि विराट कोहली शुन्यावर बाद झाले. पुन्हा एकदा भारताचा डाव सांभाळण्याची जबाबदारी भारताच्या मधल्या पट्टीतील फलंदाजांवर आली आहे. सध्या सुरेश रैना भारतीय संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत असून त्याचे अर्धशतक झाले आहे.
भारत-
गौतम गंभीर(२४ धावा)
रोहित शर्मा (४ धावा)
विराट कोहली (० धावा)
युवराज सिंग (० धावा)
महेंद्रसिंग धोनी (१५ धावा)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2013 12:21 pm