07 August 2020

News Flash

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर, सिंधू-सायना, किदम्बी श्रीकांतचा संघात समावेश

मलेशियात रंगणार स्पर्धा

आशियाई बॅडमिंटन

भारतीय बॅडमिंटन महासंघाने आगामी आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ६ ते ११ फेब्रुवारीदरम्यान मलेशियात ही स्पर्धा रंगणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल होऊ शकला नव्हता, म्हणून यंदाच्या स्पर्धेसाठी भारतीय बॅडमिंटन महासंघाने तुल्यबळ संघ मैदानात उतरवला आहे.

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी असा असेल भारतीय संघ –

पुरुष एकेरी गट – किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, साई प्रणीत, समीर वर्मा

महिला एकेरी गट – पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, कृष्णप्रिया, ऋत्विका गड्डे

पुरुष दुहेरी गट – सात्विक साईराज/चिराग शेट्टी, मनु अत्री/सुमीत रेड्डी, श्लोक रामचंद्रन/एम.आर. अर्जुन

महिला दुहेरी गट – आश्विनी पोनाप्पा/सिकी रेड्डी, प्राजक्ता सावंत/संयोगिता, रितूपर्णा दास/मिथीला यु.के.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2018 11:00 am

Web Title: badminton association of india announced detailed squad for asian badminton championship
Next Stories
1 मॅरेथॉनच्या पलीकडे!
2 गॉफिन, वावरिंका दुसऱ्या फेरीतच बाहेर
3 अपयशाचे खापर झिदानवरच का?
Just Now!
X