News Flash

भारतीय बॅडमिंटन महासंघाकडून सायना व कश्यपला पाच लाख रुपये

ऑल इंग्लंड रौप्यपदक विजेती सायना नेहवाल व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेता पारुपल्ली कश्यप यांना भारतीय बॅडमिंटन महासंघाने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

| March 18, 2015 02:29 am

ऑल इंग्लंड रौप्यपदक विजेती सायना नेहवाल व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेता पारुपल्ली कश्यप यांना भारतीय बॅडमिंटन महासंघाने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये केलेल्या अव्वल दर्जाच्या कामगिरीबद्दल सायना व कश्यप यांचा गौरव केला जाणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी यंदा सईद मोदी चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील एकेरीत विजेतेपद पटकावले होते. सायनाने ऑल इंग्लंड स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी पहिलीच भारतीय महिला होण्याचा मान मिळविला होता. ‘‘या दोन्ही खेळाडूंनी देशाला अभिमानास्पद अशी कामगिरी केली असल्यामुळेच त्यांना रोख बक्षीस देण्याचा आम्ही निर्णय घेतला,’’ असे महासंघाचे अध्यक्ष अखिलेश दासगुप्ता यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 2:29 am

Web Title: badminton association of india announces rs 5 lakh cash reward for saina kashyap
Next Stories
1 भारतात मोटरसायकल शर्यतीला उज्ज्वल भविष्य!
2 इराणी चषक क्रिकेट स्पर्धा : कर्नाटकचा २४४ धावांत खुर्दा
3 अनुत्तीर्ण झालेल्या ६ संघांचे प्रगतिपुस्तक
Just Now!
X