गोव्यात पुढील महिन्यात एका बॅडमिंटन स्पर्धेचे तेथील स्थानिक आयोजकांकडून आयोजन होत आहे. मात्र त्या स्पर्धेला मान्यता नाही, त्यामुळे त्यामध्ये सहभाग घेऊ नये, असे पुन्हा एकदा भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) खेळाडूंना सांगितले आहे.
‘‘गोवास्थित होणारी स्पर्धा ही आगामी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धासाठी निवड चाचणी असल्याचे तेथील स्थानिक आयोजकांकडून सांगितले जात आहे. मात्र त्या स्पर्धेबाबत ‘बीएआय’ आणि गोवा बॅडमिंटन संघटना यांना कोणतीही माहिती नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी निवड चाचणी स्पर्धा खेळवण्याचा अधिकार हा फक्त बॅडमिंटन संघटनेलाच आहे,’’ असे ‘बीएआय’चे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितले. ‘‘जर कोणत्याही खेळाडूने, प्रशिक्षकाने गोव्यातील अनधिकृत स्पर्धेत सहभाग घेतला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. बीएआयशी संलग्न नोंदणीकृत खेळाडूंनी अशाप्रकारच्या स्पर्धापासून नेहमी दूर रहावे,’’ असे सिंघानिया यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय खेळाडूंनी आरोग्याच्या सुरक्षिततेकडेही लक्ष द्यावे, असे सिंघानिया यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2020 12:21 am