08 August 2020

News Flash

बॅडमिंटन वर्ल्ड चँपियनशिप : पी.व्ही. सिंधू आणि प्रणीतची सेमीफायनलमध्ये धडक

सेमी फायनलमध्ये धडक मारल्याने दोघांचंही मेडल निश्चित झालं आहे

प्रकाश पदुकोण यांच्यानंतर 36 वर्षांनी इतिहास रचत साई प्रणीतने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. प्रणीतने जॉनथन ख्रिस्टीचा 24-22, 21-24 अशा सेटमध्ये पराभव केला. तर पी. व्ही. सिंधूनेही ताइ यिंगला हरवत 12-21, 23-21, 21-9 अशा सेटमध्ये हरवत सेमीफायनलमध्ये धडक मारली.

पुरुष एकेरी स्पर्धेत प्रणीतने दमदार खेळी करत 24-22 आणि 21-14 अशा सेटमध्ये सामना जिंकत सेमी फायनलमधलं स्वतःचं स्थान निश्चित केलं. 51 मिनिटात प्रणीतने त्याच्या प्रतिस्पर्ध्याला हरवलं. याआधी 1983 मध्ये प्रकाश पदुकोण यांनी ही मजल मारली होती. त्यांच्यानंतर सेमीफायनलमध्ये जाणारा प्रणीत आहे. त्यामुळे त्याने ऐतिहासिक खेळी करत सेमीफायनलमध्ये धडक मारली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पी. व्ही सिंधूने गेल्या वर्षी वर्ल्ड टूर फायनलमध्ये ताइ झू ला 3 गेम्सने मात दिली होती. याआधी या दोघींमध्ये एकूण 14 सामने झाले आहेत. ज्यापैकी 4 सिंधूने जिंकले आहेत तर 10 ताइ झूने जिंकले आहेत. ताइ झू विरोधात मी कसोशीने लढले. हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारल्याचा मला आनंद वाटतो आहे असं सिंधूने म्हटलं आहे. शनिवारी सेमी फायनल होणार आहे त्यावेळीही मी चांगला खेळ करेन असा मला विश्वास आहे असेही सिंधूने म्हटले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2019 10:16 pm

Web Title: badminton p v sindhu and sai praneeth enter semifinals of bwf world championships scj 81
Next Stories
1 Ashes 2019: ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा धुव्वा, ६७ धावांवर अख्खा संघ गारद
2 Ind vs WI : मी स्वार्थी माणूस नाहीये, शतक हुकलं तरी हरकत नाही – अजिंक्य रहाणे
3 विराट सचिनचा शंभर शतकांचा विक्रम मोडेल – विरेंद्र सेहवाग
Just Now!
X