News Flash

बॅडमिंटन : सिंधू उपांत्य फेरीत

विजेतेपदची हॅट्ट्रिक साधण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

पी. व्ही. सिंधू

भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूने मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे आणि विजेतेपदची हॅट्ट्रिक साधण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. सिंधूने चुरशीच्या लढतीत चीनच्या चेन येफुईवर २१-१३, १८-२१, २१-१४ असा रोमहर्षक विजय मिळवला. या स्पर्धेत आव्हान राहिलेली ती एकमेव भारतीय खेळाडू आहे. १५व्या मानांकित साईप्रणीतला सव्वा तासाच्या लढतीनंतर गोहसुआन हुआतकडून १६-२१, २३-२१, १३-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. उत्कंठापूर्ण लढतीत त्याने दुसरा गेम घेतल्यानंतर खेळावरील नियंत्रण गमावले. सातव्या मानांकित प्रणॉयला इंडोनेशियाच्या एहसान मौलाना मुस्तफाने १८-२१, २१-१९, २१-११ असे हरवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 3:20 am

Web Title: badminton sindhu semifinal round
टॅग : P V Sindhu
Next Stories
1 राजकारणामुळेच पाकिस्तानातील शरीरसौष्ठवाचा खेळखंडोबा!
2 न्यूझीलंडची दाणादाण
3 अर्जेटिनाचा भारतावर विजय
Just Now!
X