सध्या देशभरात कथित गोरक्षक आणि त्यांच्याकडून होत असलेल्या हिंसेचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. आतापर्यंत अनेकांना गोरक्षकांनी केलेल्या हिंसाचारात आपला जीव गमवावा लागला आहे. याच मुद्द्यावर माजी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने केलेलं उपरोधिक ट्विट सध्या चांगलचं चर्चेचा विषय बनलं आहे. लवकरच गाईलाही देशात मतदानाचा अधिकार मिळणार आहे, असं ट्विट टाकत ज्वालाने देशात सुरु असलेल्या घटनांवर आपलं मत मांडलं.

मात्र ज्वालाने केलेलं हे ट्विट तिच्या चाहत्यांनी काही रुचलं नाही. तुझ्यासारख्या खेळाडूकडून अशा ट्विटची अपेक्षा नव्हती असं म्हणत अनेकांनी ज्वालावर टिकेचा भडीमार केला आहे.

मात्र यावेळीही ज्वाला गुट्टा टिकाकारांना पुरुन उरली आहे. अनेकांना मी केलेलं ट्विट आक्षेपार्ह वाटलं, पण गायीवरुन तथाकथिच गोरक्षकांनी लोकांचे जीव घेतले तेव्हा तुमच्यातली माणुसकी कुठे गेली होती असा पडखर सवाल ज्वालाने विचारला आहे.