11 August 2020

News Flash

अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षकपदावरून बहादूर सिंग पायउतार

बहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने  २०१० दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत १२ पदके  मिळवली

संग्रहित छायाचित्र

 

वयोमर्यादेनुसार करारात मुदतवाढ देण्यास भारतीय क्रीडा प्राधिकरणाने नकार दिल्यानंतर बहादूर सिंग हे तब्बल २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून मंगळवारी पायउतार झाले.

राष्ट्रीय सराव शिबिरातील प्रशिक्षकांसाठी वयोमर्यादा ७० वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र १९७८ आणि १९८२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते गोळाफेकपटू बहादूर सिंग यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपुष्टात आला. मात्र त्यांना करारात मुदतवाढ देण्यास भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) नकार दर्शवला. फेब्रुवारी १९९५पासून ते भारताचे अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक होते.

बहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने  २०१० दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत १२ पदके  मिळवली. २०१८च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आठ सुवर्णपदकांसह एकूण २० पदके  जिंकली होती.

जागतिक अ‍ॅथलेटिक्सवर आम्ही लक्ष कें द्रित के ल्यानंतर बहादूर सिंग यांचे भारतीय अ‍ॅथलेटिक्ससाठी मोलाचे योगदान लाभले. ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाला त्यांचे मार्गदर्शन हवे होते. पण आता ऑलिम्पिक स्पर्धाच पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र त्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनानुसार आम्ही सराव आणि प्रशिक्षणाची जबाबदारी पाहणार आहोत.

-आदिल सुमारीवाला, भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:14 am

Web Title: bahadur singh steps down as athletics coach abn 97
Next Stories
1 वरच्या क्रमांकावर फलंदाजीस धोनीच योग्य -गांगुली
2 क्रिकेटपटू प्रवीण तांबेची पुनर्निवृत्ती
3 चीन, हॉलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा रद्द
Just Now!
X