भारताचा माजी कर्णधार व आंतरराष्ट्रीय खेळाडू बायचुंग भूतिया याची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भूतिया याने दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या खराब कामगिरीनंतर २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली होती. त्याचा १६ वर्षांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव लक्षात घेऊन त्याच्याकडे तांत्रिक समितीची जबाबदारी आम्ही सोपविली आहे. महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे महासंघाचे उपाध्यक्ष सुब्रतो दत्ता यांनी सांगितले.
महासंघाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भूतियाने १०७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले असून, ४२ गोल त्याच्या नावावर आहेत.