News Flash

World Wrestling Championship : बजरंग पुनियाला कांस्यपदक

पिछाडी भरुन काढत मंगोलियन प्रतिस्पर्ध्यावर केली मात

भारतीय कुस्तीपटूने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत दमदार पुनरागमन करत ६५ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली आहे. कझाकस्तान येथे सुरु असलेल्या स्पर्धेत बजरंगने मंगोलियाच्या तुलगा तुमुर ओचीरवर ८-७ ने मात केली. महत्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यात बजरंग सुरुवातीला ०-६ अशा पिछाडीवर होता, यानंतर बजरंगने आपला सर्व अनुभव पणाला लावत कांस्यपदक आपल्या नावे केलं.

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासातलं बजरंगचं हे तिसरं पदक ठरलं आहे. २०१३ साली बजरंगने कांस्यपदकाची कमाई केली होती, तर याच स्पर्धेत गतवर्षी बजरंग रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. जागतिक स्पर्धेत ३ पदकांची कमाई करणारा बजरंग पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. बजरंगने याआधी २०२० टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 7:44 pm

Web Title: bajrang punia clinches bronze in wrestling world championship first indian to win three worlds medals psd 91
टॅग : Bajrang Puniya
Next Stories
1 टी-२० संघात स्थान न मिळाल्याची चिंता नाही – कुलदीप यादव
2 श्रीलंकेच्या खेळाडूवर आयसीसीची मोठी कारवाई, एका वर्षासाठी केलं निलंबीत
3 World Boxing Championship : अमित पांघलची ऐतिहासिक कामगिरी, अंतिम फेरीत धडक
Just Now!
X