News Flash

जागतिक स्पर्धेचं रौप्यपदक बजरंग पुनियाकडून अमृतसर रेल्वे अपघातग्रस्तांना समर्पित

अंतिम फेरीत जपानच्या खेळाडूची बजरंगवर मात

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा बजरंग पुनिया

भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने पुन्हा एकदा आपलं सामाजिक भान दाखवून दिलं आहे. जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत बजरंगने मिळवलेलं रौप्यपदक, अमृतसर रेल्वे अपघातातील मृतांना समर्पित केलं आहे. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात झालेल्या स्पर्धेत जपानच्या मल्लाने अंतिम फेरीत बजरंगवर मात केली. १६-९ च्या फरकाने सामना जिंकत जपानच्या खेळाडूने सुवर्णपदक मिळवलं.

या स्पर्धेनंतर बजरंगने आपल्या ट्विटर हँडलवरुन हे पदक आपण अमृतसर रेल्वे अपघातातील मृत व्यक्तींना समर्पित करत असल्याचं सांगितलं.

शुक्रवारी अमृतसरच्या चौडा बाजार परिसरात रावण दहनाच्या वेळी झालेल्या अपघातात, ६१ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 3:20 pm

Web Title: bajrang punia dedicates silver medal at world championship to amritsar train accident deceased
टॅग : Bajrang Puniya
Next Stories
1 मुंबईकर शार्दूल ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार
2 IND vs WI : ‘तू तर पावशेर पण नाहीस’; नेटकऱ्यांनी उडवली चहलची खिल्ली
3 ८० वर्षाचा धोनी व्हीलचेअरवर असला तरीही संघात घेईन – डीव्हिलियर्स
Just Now!
X