News Flash

बजरंगाची कमाल ! Rome Ranking Series मध्ये भारतीय मल्ल चमकले

बजरंग-रवीची सुवर्णपदकाची कमाई

Rome Ranking Series स्पर्धेत विनेश फोगाट पाठोपाठ भारताच्या पुरुष मल्लांनीही आपला डंका वाजवला आहे. ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनिया तर ६१ किलो वजनी गटात रवी कुमार दहीयाने सुवर्णपदकाची कमाई केली.

अवश्य वाचा – नव-वर्षाची ‘सुवर्ण’सुरुवात, विनेश फोगाट चमकली

२५ वर्षीय बजरंगने अंतिम सामन्यात दमदार पुनरागमन करत अमेरिकेच्या जॉर्डन मायकल ऑलिव्हरवर ४-३ ने मात करत यंदाच्या वर्षाचं पहिलं सुवर्णपदक मिळवलं. याआधी उपांत्य फेरीतही बजरंगने अमेरिकेच्याच झेन रेदरफोर्डची कडवी झुंज मोडून काढली होती. या सामन्यातही बजरंगने ५-४ असा विजय मिळवला होता. अंतिम सामना गमावल्यानंतर अमेरिकेच्या कुस्तीपटूनेही बजरंगच्या खेळाचं कौतुक केलं.

आपल्या ५७ किलो वजनी गटातून न खेळता ६१ किलो वजनी गटाचा पर्याय निवडणाऱ्या रवी कुमार दहीयानेही बहार आणली. कझाकस्तानच्या नुरबोलत अब्दुलायेव्हचा १२-२ ने फडशा पाडला. रवीने आपल्या नवीन वजनी गटात आश्वासक खेळ करत तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र ७४ किलो वजनी गटात जितेंद्र कुमार आणि ८६ किलो वजनी गटात दीपक पुनिया यांचं आव्हान संपुष्टात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 1:32 pm

Web Title: bajrang punia ravi dahiya clinch gold at rome ranking series psd 91
Next Stories
1 Ind vs Aus : यहाँ के हम सिकंदर ! रोहित-विराटच्या झंझावातासमोर कांगारुंची शरणागती
2 झोप उडवणारी घटना : भारताचा आघाडीचा गोलंदाज डिप्रेशनमुळे करणार होता आत्महत्या
3 Mumbai Marathon 2020 : १७व्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद
Just Now!
X