05 March 2021

News Flash

Asian Games 2018 : बजरंगची ‘सुवर्ण’ कामगिरी स्व. अटलजींना समर्पित

जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८ असे केले पराभूत

Asian Games 2018 : भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पहिल्याच दिवशी ६५ किलो वजनी गटात त्याने जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८ असे पराभूत केले. या बरोबरच बजरंगने भारताला यंदाचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

भारताला मिळालेले हे पहिले सुवर्ण पदक आणि हा विजय बजरंगने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले आहे. बजरंगने ट्विट करुन अटलजींना वंदन केले आहे आणि आपले पदक त्यांना समर्पित केले आहे.

बजरंगने सुरुवातीला ६-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ताकातानी याने पुनरागमन करत ६-४ असा सामना रंगात आणला. पण सामन्याच्या अखेरीस ११-८ अशा फरकाने भारताच्या बजरंग पुनियाने सामना जिंकला आणि भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. भारताचे हे संपूर्ण दिवसातील एकमेव सुवर्णपदक ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2018 10:43 pm

Web Title: bajrang puniya dedicated gold medal to late atal bihari vajpayee
Next Stories
1 Asian Games 2018 : पहिल्याच दिवशी सुशील कुमारचं आव्हान संपुष्टात
2 England vs India 3rd Test – Live : इंग्लंडच्या फलंदाजांना हार्दिकचा ‘पंच’; भारताकडे २९२ धावांची भक्कम आघाडी
3 Asian Games 2018 : कांस्यपदकाचं श्रेय पूर्णपणे अपुर्वीला – रवी कुमार
Just Now!
X