News Flash

बघा..धोनी हेल्मेटनेही झेल टिपतो!

धोनी अगदी यष्टींच्या खूप जवळ उभा राहून यष्टीरक्षण करतो.

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया आणि निर्णायक ट्वेन्टी-२० सामन्यात देखील धोनीचा यष्टीरक्षण करतानाचा कमालीचा हजरजबाबीपणा दिसून आला.

जगात काहीच अशक्य नाही…फक्त इच्छाशक्ती हवी, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे महेंद्रसिंग धोनी. प्रबळ इच्छाशक्ती आणि विजयाची अविरत उर्मी असणाऱया धोनीने आजवर भारतीय संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण सामने आपल्या अप्रतीम खेळीने जिंकून दिले आहेत. धोनीची फलंदाजी जितकी भरवशाची राहिली तितकाच तो यष्टीरक्षणातही जबरदस्त कामगिरीसाठी ओळखला जातो. धोनीच्या यष्टीरक्षणातील चपळता आणि हुशारी याची उदाहरणं क्रिकेटविश्वात दिली जातात. धोनीने आपल्या अफलातून यष्टीरक्षणाने प्रतिस्पर्धी संघांना आवाक करून सोडले आहे.

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया आणि निर्णायक ट्वेन्टी-२० सामन्यात देखील धोनीचा यष्टीरक्षण करतानाचा कमालीचा हजरजबाबीपणा दिसून आला. फिरकीपटू गोलंदाजी करत असताना धोनी अगदी यष्टींच्या खूप जवळ उभा राहून यष्टीरक्षण करतो. भारताचा फिरकीपटू अमित मिश्राने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केलेल्या गोलंदाजीवरही एक वेगळाच क्षण उपस्थितांना अनुभवायला मिळाला. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन फलंदाजी करत असताना मिश्राने टाकलेला फिरकी चेंडू त्याला खेळता आला नाही आणि चेंडू थेट यष्टीरक्षण करणाऱया धोनीच्या हेल्मेटमध्ये गेले. चेंडू हेल्मेटमध्येच स्थिरावला आणि धोनीने झेल टीपल्यासाठीचा पंचांकडे अपील केला, पण पंचांनी त्याला नकार दर्शवला. यष्टीरक्षण करताना चेंडू हेल्मेटमध्ये अनवधानाने गेला असला तरी सोशल मीडियावर धोनी आता हेल्मेटनेही झेल टीपतो, असे मजेशीर मेसेज व्हायरल होत आहेत. सामन्यातील या प्रसंगाचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला असून त्याला नेटिझन्सची चांगली पसंती मिळत आहे.

 

dhonigrill

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 4:59 pm

Web Title: ball in dhoni helmet in t20 match against england
Next Stories
1 ८ धावांमध्ये चक्क ८ विकेट्स..क्रिकेट विश्वात टीम इंडियाचा अनोखा पराक्रम
2 BLOG : चहलने केले इंग्लंडचे हाल
3 सुरेश रैनाच्या षटकाराने मुलगा जखमी
Just Now!
X