News Flash

Ball of the Century: शेन वॉर्नने आजच्याच दिवशी केली होती ऐतिहासिक कामगिरी

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने १८ वर्षांपूर्वी शेवटची कसोटी खेळली होती, परंतु आजही त्याच्या 'बॉल ऑफ द सेंचुरी' बद्दल क्रिकेट विश्वात चर्चा होत असते.

शेन वॉर्ननं आज टाकला होता ऐतिहासिक चेंडू (photo ap)

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने १४ वर्षांपूर्वी शेवटची कसोटी खेळली होती, परंतु आजही त्याच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ बद्दल क्रिकेट विश्वात चर्चा होत असते. कसोटी क्रिकेटमध्ये ७०० पेक्षा अधिक बळी घेणारा वॉर्न हा एकमेव लेग स्पिनर आहे. आजपासून २८ वर्षांपूर्वी मॅनचेस्टर येथे इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेच्या कसोटी सामन्यात वॉर्नने इंग्लंडचा फलंदाज माइक गॅटिंगला क्लीन बोल्ड केले होते. यावेळी चक्क चेंडू ९० डिग्री टर्न झाला होता.

वॉर्नने १९९२ मध्ये सिडनी येथे भारताविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. पहिल्या कसोटीत त्याला फारशी कामगिरी करता आली. त्याने फक्ता एक विकेट घेतली होती. अ‍ॅशेस मालिकेत पदार्पण करण्यापूर्वी वॉर्न लेगस्पिनर होता त्याने ११ कसोटींमध्ये ३२ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. वॉर्नला एकावेळी ५ कींवा त्यापेक्षा अधीक बळी मिळवण्यास यश मिळाले होते. १९९२ च्या बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नने वेस्ट इंडिजविरुद्ध ५२ धाव देत ७ बळी घेतले होते. अ‍ॅशेस मालिकेत वॉर्नची खरी कामगीरी पहायला मिळाली. वॉर्नने ५ कसोटी सामन्यात २९ विकेट्स घेतल्या परंतु त्याने टाकलेल्या पहिल्या चेंडूची आजही चर्चा होते.

सर्वात महान बॉलची उपाधी

इंग्लंड दौर्‍यावरील अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात २८९ धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर ग्रॅहम गूच आणि माईक ऑर्थन यांनी इंग्लंडकडून पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. या स्कोअरवर आर्थटन बाद झाला. त्याच्या नंतर माईक गॅटिंग फलंदाजीला आला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार लन बॉर्डरने चेंडू शेन वॉर्नला दिला. सामन्यात वॉर्नचा हा पहिला ओव्हर होता. गॅटिंग ४ धावांवर खेळत होता. वॉर्नने फ्लाइटेड चेंडू टाकला. जो लेग स्टंपच्या बाहेर पडला. प्रत्येकाला वाटले की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाईल. पण काय झाले हे पाहून सर्वजण थक्क झाले. चेंडू थेट गॅटिंगच्या ऑफ स्टंपवर गेला. त्यानंतर या चेंडूला सर्वात महान बॉलची उपाधी देण्यात आली.

शेन वॉर्न सुद्धा झाला होता आश्चर्यचकित

त्याचवेळी गॅटिंगचे म्हणणे आहे की त्याला हा क्षण नेहमीच आठवेल कारण तोही या चेंडूतून इतिहासाचा एक भाग झाला. दुसरीकडे शेन वॉर्न म्हणाला की, असा चेंडू तो फेकू शकतो असे मला कधीही वाटले नव्हते. वॉर्न म्हणाला की तो फक्त लेग ब्रेक करण्याचा  प्रयत्न करीत होता, परंतु चेंडूने ९० डिग्री टर्न घेतला, हे आश्चर्यकारक होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 11:56 am

Web Title: ball of the century shane warne bowled historic ball today srk 94
Next Stories
1 ENG VS NZ: डेव्हन कॉनवेने षटकार खेचत झळकावले दुहेरी शतक, रचला इतिहास
2 ‘२०१४’ आणि आताचा ‘विराट कोहली’ यांच्यात फरक, रवी शास्त्री म्हणाले…
3 ‘जडेजा सारखा खेळाडू  इंग्लंडला मिळाला तर…’ पीटरसन म्हणाला…
Just Now!
X